Apple Store iPhone Stolen: अमेरिकेतील सिएटल येथील अॅपल स्टोअरमधून चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये 4.10 कोटी रुपये किमतीचे 436 आयफोन चोरल्याची घटना घडली आहे.
तुम्ही अमेरिकन वेब सिरीज 'मनी हाईस्ट' किंवा 'ओशन इलेव्हन' हा चित्रपट पाहिला असेलच. अशाच प्रकारे चोरांनी अॅपल स्टोअरच्या शेजारी असलेल्या कॉफी शॉपचा वापर करून अॅपल स्टोअरची सुरक्षा यंत्रणा तोडून स्टोअरमध्ये प्रवेश केला.
या चोरांनी बाथरूमखाली बोगदा खणून अॅपल स्टोअरमध्ये प्रवेश केला. येथून या चोरांनी सुमारे 50,000 डॉलर म्हणजेच सुमारे 4.10 कोटी रुपये किमतीचे 436 आयफोन चोरले. (Latest Marathi News)
किंग 5 न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना रिजनल रिटेल मॅनेजर एरिक मार्क्स यांनी सांगितले की, ही चोरीची घटना घडल्यावर त्यांना सकाळी फोन आला. मात्र अशीही कोण चोरी करू शकतो यावर त्यांचा विश्वास बसला नाही.
पोलिसांनी सांगितलं की, अॅपल स्टोअरमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्या दुकानाचा वापर करण्यात आला होता. मार्क्सने किंग 5 न्यूजला सांगितले की, 'आम्ही अॅपल स्टोअरच्या जवळपास आहोत, हे मला कधीच माहीत नव्हते.'
कॉफी शॉपचे सीईओ माईक ऍटकिन्सन यांनी ट्विटरवर या घटनेचा एक फोटो ट्वीट केला आहे. ज्यात चोरांनी बनवलेला बोगदा दिसत आहे. हा फोटो ट्वीट करत त्यांनी लिहिलं आहे की, 'आमच्या एका रिटेल लोकेशनमध्ये दोन जण घुसले, का? आमच्या बाथरूमच्या भिंतीला भगदाड पाडून अॅपल स्टोअरमध्ये घुसण्यासाठी आणि 500,000 डॉलर्स किमतीचे आयफोन चोरण्यासाठी.''
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.