Jammu and kashmir terrorists attack  Saam TV
देश विदेश

Terrorists Attack : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी हल्ला; राजौरीतील लष्कराच्या छावणीवर अंधाधुंद गोळीबार

Jammu and kashmir terrorists attack : जम्मू काश्मीरच्या राजौरीत भारतीय लष्कराच्या छावणीवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काही जवान जखमी झाले आहेत.

Satish Daud

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी हल्ले काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अगदी आठवडाभरापूर्वी जम्मूच्या डोडा येथे दशतवाद्यांनी अचानक भारतीय जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कराचे ४ जवान शहीद झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी राजौरीतील खवास भागात हल्ला केला आहे.

भारतीय लष्कराच्या (Indian Army) छावणीवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे काही जवान जखमी झाले आहेत. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिलं जातंय.

लष्कर आणि पोलिसांनी परिसराला चारही बाजूंनी वेढा घातला आहे. राजौरीचे एसएसपी आणि एसओजी म्हणजेच पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप घटनास्थळी पोहोचले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे राजौरीतील गुंडा भागात संशयित दहशतवाद्यांनी (Terrorists Attack) सुरक्षा चौकीवर गोळीबार केला.

अंदाजे पहाटे ४ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हा गोळीबार केला. त्यानंतर भारतीय जवानांनी देखील दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. या हल्ल्यात काही जवान जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर दहशतवादी लपून बसले असून सुरक्षा दलांनी घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली आहे. राजौरीतील एका दुर्गम गावात झालेला दहशतवादी हल्ला भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे.

मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मोठी वाढ झाली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांना सातत्याने दहशतवादी लक्ष्य करीत आहेत. गेल्या सोमवारी देखील जम्मूच्या डोडा येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात लष्कराचे ४ जवान गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना वीरमरण आलं होतं. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Shooting Case: टायगरवरील गोळीबार प्रकरण; मास्टरमाईंड अनिल पंडितच्या भावजयीला अटक, आरोपींची संख्या १३ वर

MLC Election: भाजपमध्ये गेलेल्या २ अपक्ष नेत्यांची आमदारकी जाणार; काय आहे नियम? PK च्या पक्षाकडून तक्रारीनंतर चर्चेला उधाण

Weight Loss Diet Tips: वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय टाळावे जाणून घ्या

‘५०० कोटीनंतर आणखी ४ बॉम्ब टाकणार’; अनेकांची नावं उघड करणार,मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

5 Crispy Chakli Recipe For Diwali: दिवाळीसाठी बनवा ५ प्रकारच्या खमंग आणि कुरकुरीत चकल्या! वाचा सोप्या रेसिपीज

SCROLL FOR NEXT