Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Diesel News : महागाईने त्रस्त नागरिकांना आणखी एक झटका, पेट्रोल-डिझेल महागणार?

Petrol Diesel Price News : पेट्रोल-डिझेल महागणार? काय आहे कारण?

Shivani Tichkule

Petrol Diesel Latest Price : सौदी अरेबिया आणि ओपेक प्लस देशांनी पुढील महिन्यापासून कच्च्या तेलाच्या उत्पादनात दररोज सुमारे 1.16 दशलक्ष बॅरल कपात करण्याची घोषणा केली आहे. वाढत्या महागाईच्या काळात तेल निर्यातदार देशांचे हे पाऊल उचलले आहे.

त्यामुळे जगभरासह भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रियाध आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणखी ताणले जाऊ शकतात. याचाही परिणाम कच्च्या तेलाच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

सौदी अरेबियाने (Saudi Arabia) म्हटले आहे की, ते 2023 च्या अखेरीस मे पासून दररोज अर्धा दशलक्ष बॅरल तेल उत्पादन कमी करणार आहे. सौदी अरेबियाच्या ऊर्जामंत्र्यांनी रविवारी सांगितले की, या निर्णयामुळे तेल बाजार स्थिर होण्यास मदत होईल. काही ओपेक आणि बिगर ओपेक देशांच्या संमतीने ही कपात केली जाईल. मात्र, त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. उत्पादनातील ही घट ऑक्टोबर 2022 मध्ये घोषित केलेल्या कपातीच्या व्यतिरिक्त असेल. (Petrol Diesel)

पाकिस्तान रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याच्या तयारीत

भारताप्रमाणेच पाकिस्ताननेही रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याची योजना आखली आहे. पाकिस्तानचे पेट्रोलियम राज्यमंत्री मुसादिक मलिक यांनी सांगितले की, पुढील महिन्यात पाकिस्तान पहिला ऑर्डर देईल.

पेट्रोल डिझेल पुरेशा उपलब्धतेसाठी निर्यातीवर बंदी

दुसरीकडे, देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. अधिसूचनेत तेल रिफायनरी कंपन्यांना सांगण्यात आले आहे की, ते त्यांच्या वार्षिक पेट्रोल (Petrol) निर्यातीपैकी 50 टक्के आणि डिझेल निर्यातीपैकी 30 टक्के देशांतर्गत बाजारात उपलब्ध करतील.

याचा परिणाम अशा गैर-सरकारी कंपन्यांवर होऊ शकतो. जे रशियाकडून स्वस्त कच्चे तेल विकत घेऊन शुद्ध करतात. आणि इतर देशांना चढ्या दरात पेट्रोल आणि डिझेलची विक्री करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunny Deol: लाजा वाटत नाहीत का? घरापर्यंत आलेल्या पॅप्सला सनी देओलने घातल्या शिव्या

Delhi Blast: ८ दहशतवादी, ४ शहरं आणि ४ कार... फक्त दिल्लीच नव्हे तर देशाला हादरवण्याचा होता प्लान; तपासातून धक्कादायक खुलासा

Maharashtra Live News Update : मुंबईत सिंगल-यूज प्लास्टिकविरोधात कडक कारवाई; एमपीसीबी अध्यक्ष सिद्धेश कदम

पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळला अर्धा कापलेला पाय, स्थानिकांचा थरकाप उडाला

Malaika Arora: मलाइकाचा फोटो वापरून पिंपरीत अनधिकृत जाहिरात; पालिकाने केली मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT