Mumbai Crime News : मांत्रिक मध्यरात्री शेजारच्या घराबाहेर करायचा भलतच काम; घटना सीसीटीव्हीत कैद

Borivali News : सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मांत्रिक बाबाला पोलिसांनी घेतले ताब्यात
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On

Mumbai News : मुंबईच्या बोरिवली एमएचबी कॉलनी पोलिसांनी अशा एका मांत्रिक बाबास अटक केली आहे, जो आपल्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबातील एकुलत्या एक मुलास जादूटोणा करून मारण्याचा विचार करत होता. गोकुळ भारवड (६७ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या मांत्रिक बंधू बाबा चे नाव असून तो दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा परिसरात राहणारा आहे. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Thane News : ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण, CCTV Footage आलं समोर

मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पश्चिमेकडील कांदा परिसरात राहणाऱ्या लुईस इतूर वैती (67 वर्षे) यांच्या मायकलवाडी, मोतीराम म्हात्रे रोड, दहिसर येथील ऑफिस समोर 23 आणि 24 तारखेचा मध्यरात्रीच्या काळात अज्ञात व्यक्तीने जादूटोणा करून लाल मिरच्या मिठासारखा पदार्थ एक पिवळ्या रंगाचे लिंबू त्यामध्ये लोखंडी खिळा टोचलेला, तसेच तेथेच ऑफिसच्या शटरला आणि भिंतीला एक लाकडी फळी टेकवून ठेवलेली. (Mumbai Crime News)

त्यावर "एक लडका है वो भी उपर जायेगा" असे लिहून एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची भीती घातली म्हणून फिर्यादी लुईस वैती यांनी बोरिवली एमएचबी कॉलनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या तक्रारीनुसार पोलिसांनी भादवि कलम 3(1),3(2) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा, व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

Mumbai Crime News
Pune Accident News : माळशेज घाटात कार-पिकअपमध्ये भीषण अपघात, एअर बॅग उघडल्या तरी तिघांचा मृत्यू

यानंतर तात्काळ एमएचबी पोलीस (Police) ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी यांनी घटनास्थळावर जाऊन त्या परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि इतर काही पुराव्यांचा आधार घेत आरोपीची ओळख पटवली. आरोपी हा फिर्यादी यांचा शेजारी असल्याचे समजले. मात्र आठ दिवसापूर्वीच आरोपीचे ऑपरेशन झाले असल्यामुळे त्याला लगेच अटक न करता 41अ ची नोटीस देऊन तपासाला बोलवून ताब्यात घेतली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com