West Bengal Election Violence Latest News Update : विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफळला असून राज्यात तणावपूर्ण शांतता आहे. टीएमसी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये अनेक शहरात राडा आणि वाद झाल्याचे समोर आले आहे. भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदावर सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची निर्घृण हत्या केल्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या आणखी एका कार्यकर्त्यांवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्री झेंडा फडकावल्यावर झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. भाजप कार्यकर्ते रिहोत रॉय उर्फ चिंटू याच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला.
गोळीबारात भाजप कार्यकर्ते रोहित रॉय गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रोहित यांची प्रकृती अतिशय़ गंभीर असल्याचे समजतेय. बुधवारी रात्री १० वाजता गोत्र ग्रामपंचायतीच्या राजीव कॉलनीमध्ये रोहित यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडण्यात आल्या. झेंडा फडकावण्यावरून वाद झाला होता, त्यातूनच गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, भाजप कार्यकर्ते पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी राजीव कॉलनी परिसरात आले होते. त्यावर काही स्थानिकांनी आक्षेप घेतला. दोन गटामध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. त्यानंतर याला हिंसक वळण लागले. एका व्यक्तीने रोहित रॉय यांच्यावर गोळी झाडली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात तणाव वाढला आहे. हिंसा उसळू नये म्हणून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.
मागील १५ वर्षांत तुम्ही सर्वांनी सोसलेले कष्ट आणि अत्याचार समजू शकतो. पण कुणीही कायदा हातात घेऊ नका, असे आवाहन करतोय. टीएमसीची संस्कृती स्वीकारू नका आणि त्यांनी जे केले त्याची नक्कल करण्याचा प्रयत्न करू नका. आता निवडणुका संपल्या आहेत, त्यामुळे सर्वांनी शांततेने एकत्र राहावे.भाजप नेते सुवेंदू अधिकारी
सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. त्या दिवसापासूनच राज्यात हिंसाचार उफळलाय. मंगळवारी रात्री उशिरा संदेशखालीमध्ये हिंसाचार उसळला होता. घटनास्थळावर झालेल्या गोळीबारात पोलीस आणि केंद्रीय दलाचे पाच जवान जखमी झाले होते. सर्व जखमी जवानांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील अनेक शहरात सध्या हिंसाचाराच्या घटना घडल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत हिंसाचारात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचाही समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.