Rescue teams and fire personnel at the site of the deadly explosion in Kakinada, where 18 people lost their lives in a firecracker factory blast. saam tv
देश विदेश

Firecracker Blast: फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; आगीत होरपळून 18 जणांचा मृत्यू

Fireworks Factory Fire : आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहेत.

Bharat Jadhav

  • काकीनाडा जिल्ह्यात फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट.

  • १८ जणांचा मृत्यू, अनेक जखमी.

  • अग्निशमन दल आणि पोलिसांचे बचावकार्य सुरू.

आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे एक भयानक घटना घडली आहे. फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग लागली असून यात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण गंभीररित्या होरपळले आहेत. ही घटना काकीनाडा जिल्ह्यातील पेड्डापुरम परिसरातील समलकोट मंडळातील वेतलापलेम गावात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. आग भडकण्याआधी मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

स्फोट झाला तेव्हा लोक फटाक्यांच्या कारखान्यात होते. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

सुरुवातीच्या वृत्तानुसार, कारखान्यात आग लागली, त्यावेळी मोठा स्फोट झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की मृतदेह जवळच्या शेतात फेकली गेली. ज्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कारखाना पूर्णपणे आगीत जळून खाक झाला आहे. काकीनाडा सरकारी जनरल हॉस्पिटलच्या अधीक्षकांनी सांगितले की, ९० ते १०० टक्के भाजलेले सात रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT