22-Year-Old Woman Brutally killed by lover Saam Tv News
देश विदेश

'वेश्या व्यवसायात जा नाहीतर..'लिव्ह इन पार्टनरचा नकार, प्रियकरानं जागेवरच संपवलं; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं? | Crime

22-Year-Old Woman Brutally killed by lover: वेश्याव्यवसायासाठी नकार दिल्याने लिव्ह-इन पार्टनरने चाकूने हल्ला करून २२ वर्षीय पुष्पाची हत्या केली. आंध्र प्रदेशातील ही घटना हादरवणारी ठरली आहे.

Bhagyashree Kamble

वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यामुळे एका तरुणीची तिच्या लिव्ह-इन पार्टनरने चाकूने हत्या केली. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील एका गावात घडली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुष्पा ओलेटी (वय वर्ष २२) असे मृत महिलेचं नाव आहे. ती गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी शेख शम्मासोबत बी. सवाराममध्ये भाड्याच्या खोलीत राहत होती. काही महिन्यांपूर्वी पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिचे आरोपीसोबत प्रेमसंबंध जुळले. अलिकडच्या काळात आरोपीला पुष्पाचे इतर पुरूषांसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.

त्यानंतर आरोपीनं पीडितेला वेश्याव्यवसायात सामील होण्यासाठी दबाव आणण्यास सुरूवात केली. दारूच्या नशेत तो अनेकदा या मुद्द्यावरून अनेकदा भांडत असे. बुधवारी रात्रीच्या सुमारास पुन्हा याच मुद्द्यावर दोघांमध्ये कडाक्याची भांडण झालं. तिने नकार दिल्यावर आरोपीला राग अनावर झाला. त्यानं थेट चाकू काढला आणि पीडितेवर हल्ला चढवला. तिच्या छातीला आणि पायाच्या डाव्या बाजूला खोल जखम झाली. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू.

पुष्पाची आई आणि त्याच्या भावानेही या भांडणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपीनं त्यांच्यावरही धारदार चाकूनं वार केला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पुष्पाचा मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. राजोलू सर्कल इन्स्पेक्टर नरेश कुमार म्हणाले की, 'या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी २ पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime : घरात सुरू होता देहविक्रीचा व्यवसाय; डमी ग्राहक पाठवत पोलिसांची छापेमारी, दांपत्याला अटक

Pune Accident: श्रावण सोमवारी भाविकांवर काळाचा घाला, ३५ जणांना घेऊन जाणारा टेम्पो दरीत कोसळला; चौघांचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update: विहिरीत पडलेल्या पत्नीला वाचवताना पती विहिरीत पडल्या

Milk For Skincare : अशाप्रकारे करा त्वचेसाठी दुधाचा वापर, त्वचा होईल टवटवीत, चेहरा दिसेल तरूण

सैराट! प्रेमप्रकरणातून दोघे फरार, भावानं रक्षाबंधनाच्या दिवशीच बहिणीचं मुंडन करत संपवलं; दाजीचाही जीव घेतला

SCROLL FOR NEXT