देश विदेश

IPS Officers Suspend: 3 IPS अधिकारी निलंबित; अभिनेत्री कादंबरी जेठवानीच्या आरोपानंतर आंध्र प्रदेश सरकारची कारवाई, काय आहे प्रकरण?

Andhra IPS Officers Suspend : आंध्र प्रदेश सरकारने रविवारी मुंबईतील अभिनेत्री कांदबरी जेठवानीने लावलेल्या आरोपानंतर तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केलंय.

Bharat Jadhav

मुंबईतील अभिनेत्रीला चुकीच्या पद्धतीने अटक करून कायदेशीर मदत न मिळू दिल्याप्रकरणी ३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. आंध्र प्रदेश सरकारने ही कारवाई केली आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांवर पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

विजयवाड्याचे माजी आयुक्त कांथी राणा टाटा, विजयवाड्याचे माजी उपायुक्त विशाल गुन्नी आणि माजी डीजीपी (गुप्तचर) सीताराम अंजनेयालू, अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. NTR आयुक्तालय पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांवर दाखल केलेल्या कथित खोट्या गुन्ह्याचा तपास सुरू केलाय. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून इब्राहिमपट्टणम पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तसेच निलंबित करण्यात आलेल्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना विजयवाडा सोडण्यास मनाई करण्यात आलीय.

कादंबरी यांनी काही पुराव्यांसह तिच्या आणि तिच्या कुटुंबीयांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली. अखिल भारतीय सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९६९ च्या नियम ३(१) अन्वये तिन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तपास अहवालानुसार, सीताराम अंजनेयालू यांनी योग्य लेखी सूचना किंवा योग्य तपास न करता अभिनेत्रीला अटक करण्यासाठी इतर अधिकाऱ्यांसाठी मुंबईला जाण्यासाठी फ्लाइट बुक केली.

काय आहे आरोप?

कांथी राणा आणि गुन्नी यांच्यावर केवळ तोंडी सूचना देऊन कृती केल्याचा आणि योग्य तपास न करता अभिनेत्रीला अटक केल्याचा आरोप आहे. एफआयआर दाखल न करता अभिनेत्रीला अटक केल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर आहे. दरम्यान अभिनेत्री जेठवानी यांनी ऑगस्टमध्ये एनटीआरचे पोलीस आयुक्त एसव्ही राजशेखर बाबू यांच्याकडे तक्रार केली होती.

जेठवानी म्हणाले की, त्याच्यासोबत त्याच्या आई-वडिलांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईहून विजयवाडा येथे नेण्यात आले. तसेच त्यांना कोणतेही कारण नसताना एक महिन्याहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याची तक्रार अभिनेत्रीने दिलीय.

या प्रकरणी जेठवानी यांचे वकील एन श्रीनिवास यांनी माहिती दिलीय. वायएसआरसीपी नेते विद्यासागर यांनी जेठवानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना खंडणीच्या आरोपात अडकवण्यासाठी जमिनीची कागदपत्रांमध्ये छेडछाड केली. तसेच या अधिकाऱ्यांनी अनेक दिवस जामीन मिळू दिला नाही. पोलिसांनी अभिनेत्री आणि तिच्या वृद्ध आई-वडिलांचा अपमान केला. तसेच अवैधपणे कोठडीत ठेवले.

अभिनेत्री कांदबरी यांचे कुटुंबाला ४० दिवसापर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागले. मागील सरकारच्या काळात मुंबईतील एका महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर दाखल केलेला खटला मागे न घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती अभिनेत्री दिली. तशी धमकी मागील सरकारने दिली होती असंही कांदबरी जेठवानी यांनी सांगितलं.

कोण आहे कादंबरी जेठवानी?

IMDb प्रोफाइलनुसार, 28 वर्षीय कादंबरी जेठवानी एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. अहमदाबाद, गुजरात येथे हिंदू सिंधी जेठवानी कुटुंबात तिचा जन्म झाला. तिचे वडील नरेंद्र कुमार हे मर्चंट नेव्ही ऑफिसर आहेत. तर तिची आई आशा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे.

इकॉनॉमिक्समध्येही त्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. कादंबरी जेठवानीने तिचे शिक्षण प्रकाश उच्च माध्यमिक विद्यालय, माउंट कार्मेल हायस्कूल आणि उदगम शाळेतून घेतले. यासर्व अहमदाबादच्या नामांकित संस्था आहेत. वयाच्या १२व्या वर्षी तिने भरतनाट्यममध्ये विशारद ही पदवी मिळवलीय.

कांदबरी एक उत्कृष्ट विद्यार्थिनी होती. उच्च माध्यमिक परीक्षेत ती अव्वल होती. तिने अहमदाबादच्या प्रतिष्ठित NHL म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळवली. मात्र, त्यानंतर आईच्या बदलीमुळे तिच्या कुटुंबाला मुंबईला जावे लागले. मुंबईत आल्यानंतर तिची एका दिग्दर्शकाशी अचानक भेट झाली. त्यात तिला 'सड्डा अड्डा' या बॉलिवूड चित्रपटात मुख्य भूमिका मिळाली.मात्र प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाची छाप पाडण्यात ती अपयशी ठरली. यानंतर तिला औईजा (कन्नड), आटा (तेलुगू), आय लव्ह मी (मल्याळम) यांसारख्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT