BJP News: राष्ट्रपतीपदासाठी आनंदीबेन पटेल यांचेही नाव चर्चेत - Saam TV
देश विदेश

BJP News: राष्ट्रपतीपदासाठी आनंदीबेन पटेल यांचेही नाव चर्चेत

राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या जूनमध्ये आहे. त्या पदासाठी यूपीच्या सध्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचेही नाव आघाडीवर आहे

Amit Golwalkar

नवी दिल्ली - राष्ट्रपतीपदाची निवडणूक येत्या जूनमध्ये आहे. त्या पदासाठी यूपीच्या सध्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल यांचेही नाव आघाडीवर आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या आनंदीबेन यांना भाजपच्या नवीन रचनेत महत्वाचे स्थान आहे. (Anandiben Patel name may also in President candidate list of BJP)

त्या पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या विश्वासू वर्तुळात दीर्घकाळापासून राहिलेल्या आहेत. शिवाय सध्या त्यांचे व योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आगामी राष्ट्रपतीपदी महिलाच असणार हे सूत्र भाजपने प्रत्यक्षात आणले तर द्रौपदी मुर्मू, सुमित्रा महाजन यांच्याबरोबर आनंदीबेन यांचेही नाव दिल्लीत चर्चेला आले आहे.

उत्तर प्रदेशात सलग विजयासह दुसऱ्यांदा सत्ता मिळविणारे मुख्यमंत्री ठरणारे योगी आदित्यनाथ यांचे राष्ट्रीय राजकारणात आणखी एक पाऊल पुढे पडण्याचे मजबूत संकेत मिळाले आहेत. काल दिल्लीचा दौरा करणारे योगी आदित्यनाथ यांची वर्णी भाजपच्या सर्वोच्च संसदीय मंडळात लागणार हे जवळपास निश्चित आहे. या मंडळात स्थान मिळणे हे योगी यांच्या भावी पंतप्रधानपदाची दावेदारी मजबूत करणारे ठरणार आहे.

योगी यांचा भाजप संसदीय मंडळातील संभाव्य प्रवेश हा त्यांची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मार्गावरून सुरू असल्याचेही द्योतक मानले जाते. योगी यांचा समावेश झाल्यास ते या मंडळातील दुसरे मुख्यमंत्री ठरतील. मोदी यांची भेट झाल्यानंतर भाजपकडून त्यांच्या संसदीय मंडळातील समावेशाबाबतची अधिकृत घोषणा होऊ शकते.

सुषमा स्वराज, अरुण जेटली व अनंतकुमार या दिग्गजांच्या निधनानंतर भाजप संसदीय मंडळात तीन जागा रिक्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी कोण असणार, या मुद्यावर दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भाजपमधून यावर अद्याप कोणीही तोंड उघडलेले नाही. वर्तमान समीकरणांप्रमाणे भाजपमध्ये मोदी यांच्यानंतर शहा यांचे स्थान आहे व त्यांचाच शब्द मोदींनंतर अंतिम मानला जातो.

मात्र, शहा मोदी यांचे पंतप्रधानपदाचे वारसदार ठरणार का, हा सवाल भाजपच्या अंतर्गत वर्तुळात विचारला जातो. दुसरीकडे योगी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशासारखे राज्य भाजपने पुन्हा खेचून घेतल्याने त्यांच्या लोकप्रियतेचा ‘ग्राफ' चढा आहे. भाजपच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणात योगी हा ‘फिट्ट' बसणारा चेहरा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

SCROLL FOR NEXT