शेतकरी आंदोलन: सिंघु बॉर्डरवर आज महत्वाची बैठक, आंदोलनाची दिशा ठरवणार... Saam TV
देश विदेश

शेतकरी आंदोलन: सिंघु बॉर्डरवर आज महत्वाची बैठक, आंदोलनाची दिशा ठरवणार...

शेतकरी नेते राकेश टिकैत, दर्शनपाल सिंग यांच्यासह महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

वृत्तसंस्था

संतोष शाळिग्राम, नवी दिल्ली

नवी दिल्ली: शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Agitation) स्थगित करण्यासंदर्भात शेतकरी संघटना आणि सरकार (Modi Government) यांच्यात कोणतीही तडजोड झालेली नाही. आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी आज अकरा वाजता सिंघू बॉर्डरवर (Singhu Border) संयुक्त किसान मोर्चाची एक महत्त्वाची बैठक (Meeting) होत आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत, (Rakesh Tikait) दर्शनपाल सिंग यांच्यासह महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. (Farmers' Movement: An important meeting will be held today on the Singhu border to decide the direction of the movement)

हे देखील पहा -

केंद्र सरकारने (Central Government) तीन कृषी कायदे रद्द (3 Farm Laws Repealed) केल्यानंतर आंदोलन स्थगित करावे, यासाठी केंद्र प्रयत्नशील आहे. हरियाणा सरकारनेही शेतकऱ्यांशी चर्चा सुरू केली आहे. मात्र शेतकरी एमएसपी (MSP) हमी कायदा आणि आंदोलन काळात बळी गेलेल्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भरपाई या मागणीवर ठाम आहेत. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार शेतकरी संघटनांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या काहीच नेत्यांना फोन करून चर्चेसाठी आमंत्रित केले जात आहे, असा आरोप ऑल इंडिया किसान सभेचे सरचिटणीस हन्नान मुल्ला यांनी केला आहे.

संयुक्त किसान मोर्चाच्या काही नेत्यांमध्येही आता शेतकऱ्यांनी बॉर्डरवरून आपापल्या घरी गेले पाहिजे, असाही मतप्रवाह आहे. त्यामुळे आजची बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या बैठकीत आंदोलन पुढे सुरू ठेवायचे की नाही यावरही निवडा एक चर्चा होऊ शकते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Sonu Nigam : 'ये दिल दीवाना...' रस्त्यावर थांबून छोट्या चाहत्यासोबत सोनू निगमनं गायलं गाणं, पाहा VIDEO

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

SCROLL FOR NEXT