Highway Horrific Bus–Dumper Collision Saam
देश विदेश

नॅशनल हायवेवर भीषण अपघात; भरधाव डंपरची बसला धडक, १० जणांचा जागीच मृत्यू, मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Highway Horrific Bus–Dumper Collision: अमृतसह पठाणकोट महामार्गावर बस आणि डंपरची भीषण अपघात. अपघातात ४५-५० जण जखमी. १० जण ठार.

Bhagyashree Kamble

अमृतसर - पठाणकोट नॅशलन हायवेवरील कट्थूनंगल परिसरात एक दुर्देवी अपघात घडला आहे. एक प्रवासी बस आणि डंपरचा भीषण अपघात घडला आहे. या अपघातात ३५ ते ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, १० जणांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी काही काळ गोंधळ उडाला. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बटालाहून अमृतसरच्या दिशेनं जाणारी एक खासगी बस मोठ्या संख्येनं प्रवासी घेऊन जात होती. बस गोपाळपुरा गावाजवळ येताच समोरून येणाऱ्या ट्रकनं सिग्नल न देता यू-टर्न घेतला. भरधाव बसची ट्रकला धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की, बसच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेनंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस आणि रूग्णवाहिका पोहोचल्या. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. तसेच जखमींना तातडीने उपचारासाठी रूग्णालयात पाठवले. हा भीषण अपघात बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली. या भीषण अपघातानंतर महामार्गावर बराच वेळ वाहतूक झाली होती. जी पोलिसांनी बऱ्याच प्रयत्नांनंतर सोडवली.

पोलिसांकडून मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. तसेच फरार चालकाचा शोध सुरू आहे. ट्रक चालकाच्या चुकीमुळे हा भीषण अपघात घडला, असं पोलिसांनी सांगितलं. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Male Infertility: मधुमेह वाढवतो पुरुष वंध्यत्वाचा धोका? शुक्राणूंच्या आरोग्यावर होणारे परिणाम समजून घ्या

Mumbai-Thane Travel: मुंबई- ठाणे फक्त २५ मिनिटांत, विनासिग्नल प्रवास नेमका कसा होईल?

Bor Fruits Benefits: थंडीत बोरं खाण्याचे फायदे काय?

१९ मिनिटांच्या MMS व्हिडिओतील तरूण रस्त्यावर? लोकांनी त्याला काठ्यांनी मारलं; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT