Amit Shah Slams On Sharad Pawar 
देश विदेश

Amit Shah: शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार, तर राहुल गांधी अहंकारी; पुण्यात अमित शहा यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Amit Shah Slams On Sharad Pawar: लोकसभा निवडणुकीच्या काळात काही लोक विविध प्रकारचे गैरसमज पसरवतात. आरक्षणाबाबत विविध गोष्टी सांगण्यात आल्या. 2014 मध्ये जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला, तेव्हाही मोदीजी सत्तेत होते. मराठा आरक्षण देण्याचे काम आम्ही आजही केल्याचं अमित शहा म्हणाले.

Bharat Jadhav

भाजप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन पुण्यात पार पडलं. आ अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी आणि शरद पवार, उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. देशात संभ्रम निर्माण करण्याचे काम विरोधकांनी केलंय. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतही संभ्रम निर्माण केला गेला.

महाराष्ट्रात शरद पवार यांनीही संभ्रम तयार केलाय. शरद पवार हे महाराष्ट्रातील राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. त्यांनी संस्थात्मक भ्रष्टाचार केला. आता यापुढे शरद पवारांचे खोटे चालणार नाही, ते पकडलं जाईल, असं अमित शहा म्हणाले. शरद पवारांनी सरकार दूध पावडर आयात केल्याचा खोटा प्रचार केला. दूध पावडर निर्याती संदर्भात जुनं नोटीफिकेशन विरोधकांकडून व्हायरल करण्यात आलं.

त्या नोटीफिकेशनवर जुनी तारीख आहे. त्यात दूध पावडर आयात करण्यात येणार असल्याची सूचना होती. त्या ही नोटीफिकेशन पाहून आपणही थक्क झालो होतो. त्यानंतर आपण केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयुष गोयल यांना फोन केला. त्याबाबत विचारणा केली. तेव्हा गोयल म्हणाले, हे नोटिफिकेशन जुनं असून तो शरद पवार यांचा निर्णय आहे, आपला निर्णय नाही, असं शहा म्हणाले.

तसेच शरद पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले, विरोधक संभ्रम निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच विरोधक भ्रष्टाचारावरुन सरकारला घेरत असतात. परंतु स्वतः शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरदार आहेत. शरद पवारांनी भ्रष्टाचाराच्या संस्था निर्माण केल्या. आता हे चालणार नसल्याचं अमित शहा म्हणाले.

राहुल गांधी अहंकारी

लोकसभा निवडणूक हरल्यानंतर राहुल गांधी अहंकारी झालेत. निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या, एनडीएला 300 जागा मिळाल्या, पण पूर्ण इंडिया आघाडीला 240 जागाही मिळाल्या नाहीत. निवडणुकीच्या आतच देशभरातील जनतेने नरेंद्र मोदींच्या 10 वर्षांच्या राजवटीवर शिक्कामोर्तब करण्याचे काम केलंय. कोणीच ध्येय कमी ठेवत नाही, ते नेहमी मोठं ध्येय ठेवत असतात. जो विजयी होतो त्याचे सरकार बनते. त्यामुळे भारतात कोणाचा विजय झाला, तर एनडीएचा विजय झाला असल्याचं शहा यावेळी म्हणाले.

तर काँग्रेसने 10 वर्षे राज्य केले पण यूपीएमध्ये त्यांना 240 जागाही मिळाल्या नाहीत. महाराष्ट्र विधानसभेत सर्व प्रयत्न पूर्ण करून पुन्हा भगवा फडकविण्याचे काम करू, असं शहा म्हणालेत. भाजप जेव्हा हरियाणा आणि महाराष्ट्रात विजय मिळवेल तेव्हा राहुल गांधींचा अहंकार तुटेल, अशी टीकाही त्यांनी केली.

उद्धव ठाकरेंवर टीका

औरंगजेब फॅन क्लब देशाच्या सुरक्षेची खात्री देऊ शकत नाही. हे काम फक्त भाजपच करू शकते. उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते झालेत. ज्यांनी कसाबला बिर्याणी दिली त्यांच्यासोबत उद्धवजी बसलेत. पीएफआयला पाठिंबा देणाऱ्याच्या मांडीवर उद्धवजी बसलेत. हे लोक देश सुरक्षित करू शकतात का? असा सवाल अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT