Amit Shah
Amit Shah saam tv
देश विदेश

Amit Shah On Reservation : संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही : अमित शाह

Satish Kengar

Amit Shah In Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत प्रचारात आरक्षणाचा मुद्दा चर्चेचा ठरला आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी कर्नाटकातील बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) सरकारने मुस्लिमांसाठीचे चार टक्के आरक्षण रद्द केले आहे.

आता या मुद्द्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची आपल्या संविधानात तरतूद नाही.

Amit Shah On Reservation : 'आरक्षण घटनाबाह्य असल्याने रद्द केले'

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ''आमच्या पक्षाने कर्नाटकातील चार टक्के आरक्षण घटनाबाह्य असल्याने रद्द केले. देशाच्या संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले की, ''काँग्रेस पक्षाने आपल्या तुष्टीकरणाच्या धोरणाखाली कर्नाटकात मुस्लिमांना आरक्षण दिले होते, ते आम्ही काढून टाकले आहे. आरक्षणाच्या मर्यादेत राहून आरक्षण देण्याचा अत्यंत विचारपूर्वक निर्णय आम्ही घेतला आहे. काँग्रेसला ते हटवायचे आहे. मात्र एसीला जे आरक्षण देण्यात आले आहे, ते रद्द केले जाणार नाही.''

काँग्रेस कोणाचं आरक्षण कमी करणार?

काँग्रेस पक्षाला सवाल करत शाह म्हणाले की,'' मुस्लिम आरक्षण ४ वरून ६ टक्क्यांपर्यंत वाढवायचे असेल तर ते कोणाचे आरक्षण कमी करणार? हे स्पष्ट केले पाहिजे. लिंगायत, वोक्कलिगा, ओबीसी, एससी किंवा एसटी कोणाचे कमी करतील?''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs CSK IPL 2024 : बेंगळुरूची प्लेऑफमध्ये एन्ट्री पक्की; चेन्नई आयपीएलमधून बाहेर

Indian Politics 2024 : भाजप झाला मोठा संघ झाला छोटा;'आधी RSS ची गरज, आता भाजप सक्षम'

Crime News: युट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा; 9 वी पास तरुणाचा कारनामा

Maharashtra Politics: 'नावं द्या त्या पोलिसांना बघतो मी', उद्धव ठाकरेंनी भरला पोलिसांना दम; मुलुंडच्या राड्यावरून ठाकरेंचा संतापले

Kalyan Crime News : यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर ज्वलनशील पदार्थ लुटलं, कल्याणमधील घटनेने खळबळ

SCROLL FOR NEXT