Adani Group News: मोठी बातमी! अदानी समूहाच्या सिमेंट प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश, जाणून घ्या काय आहे प्रकरण

Chandrapur News : अदानी समूहाच्या सिमेंट प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश, जाणून घ्या काय
Gautam Adani Acc Cement
Gautam Adani Acc CementSaam TV
Published On

Adani Group News: अदानी समूहाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एसीसी सिमेंट (Acc Cement) कंपनीच्या चौकशीचे आदेश राष्ट्रीय हरित लवाद म्हणजेच एनजीटीने दिले आहेत.

एसीसी सिमेंट कंपनी प्रदूषण करत असल्याच्या लवादाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. याच तक्रारींवर सुनावणी करताना एनजीटीच्या पुणे खंडपीठाने प्रदूषणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

Gautam Adani Acc Cement
India Rail in Saudi Arabia : सौदी अरेबिया आणि युएईमध्ये धावणार भारतीय रेल्वे, चीनला मोठा दणका

एसीसी सिमेंट कंपनी नागपूर, मुंबई, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि इतर भागातून कचरा आणि प्लास्टिक आणून चंद्रपूर शहरालगतच्या घुग्गुस येथील कंपनीत जाळत असल्याचा आरोप आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून वर्धा नदीच्या प्रदूषणात वाढ होत असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. (Latest Marathi News)

त्यामुळे या आरोपांच्या चौकशीसाठी जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाने पथक गठीत करावे आणि २ महिन्यात Action Taken Report सादर करावा, असे आदेश देण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे. मात्र त्यांनी याबाबत कॅमेरावर काहीही बोलण्यास नकार दिलाय.

Gautam Adani Acc Cement
America Mall Shooting : अमेरिकेत मॉलमध्ये गोळीबार, एका भारतीय तरुणीसह ९ जणांचा मृत्यू

अदानी समूहाने २०२२ मध्ये खरेदी केली होती कंपनी

वर्षी २०२२ मध्ये अदानी समूहाने स्विस फर्म होल्सिमचा भारतातील व्यवसाय 10.५ अब्ज डॉलर्समध्ये (81,361 कोटी रुपये) विकत घेतला. होल्सीमकडे अंबुजा सिमेंट्समध्ये ६३.१९ टक्के आणि एसीसीमध्ये ४.४८ टक्के हिस्सा आहे. व्यवहार पूर्ण झाल्यानंतर अदानी समूहाकडे अंबुजा सिमेंट्समध्ये ६३.१५ टक्के आणि एसीसी मध्ये ५६.६९ टक्के (अंबुजा सिमेंट्सद्वारे ५०.०५ टक्के हिस्सा) आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com