
- रणजीत माजगावकर / ओंकार कदम
Ajit Pawar News : सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासऴली आहे. एका कार्यकर्त्याने मला दाखविलेला फाेटाे पाहून मला धक्काच बसला. मनगट ताेडण्याचे काम जर काेण करीत असेल आणि सरकार झाेपा काढत असेल तर ही वेळ तुमच्यावर देखील येईल, लक्षात ठेवा. मी देखील या जिल्ह्याचा पालकमंत्री हाेताे पण आम्ही असं कधी हाेऊ दिले नाही अशी टीका विराेधी पक्ष नेते अजित पवार यांनी काेरेगाव (ajit pawar in koregoan) येथे केली. दरम्यान हे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले असून बदल्यांसाठी रेट ठरल्याचा गंभीर आराेप अजित पवार यांनी केला. (Maharashtra News)
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक तसेच कोरेगाव तालुका खरेदी विक्री संघ व कोरेगाव तालुका खादी ग्रामउद्योग संस्थांमधील नवीन संचालकांचा सत्कार समारंभ आज (साेमवार) आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे आयाेजित केला आहे. या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या भ्रष्ट कामाकाजाचा सातबारा काढला.
अजित पवार म्हणाले आताच्या सरकारचे मंत्री कोणाला विचारात नाहीत, मंत्रिमंडळात बसत नाहीत. काही जणांकडून घाणेरडे शब्ध वापरले जातात. हे सर्व पाहून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या डोळ्यात पाणी येतं असेल असेही पवारांनी नमूद केले.
ते म्हणाले शिंदे- फडणवीस सरकारला सत्तेचा माज चढला आहे. केवळ ठराविक आमदारांना सांभाळायचं चालले आहे. निधी देताना मुद्दाम आडकाठी आणली जाते. राज्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सरकराने बदल्यांसाठी रेट ठरविल्याचा गंभीर आराेप अजित पवार यांनी केला.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.