Amit Shah  Amit Shah
देश विदेश

Amit Shah : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? अमित शहा यांनी केला मोठा खुलासा

Maharashtra Election 2024 : अमित शहा यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर मोठं भाष्य केलं आहे. तसेच अमित शहा यांची महायुतीच्या नेत्यांसोबत बंद दाराआड बैठक देखील झाली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या आठवड्यात राजकीय प्रचाराचा धडाका लावला आहे. सर्व उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन फंडे वापरण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याचीही जोरदार चर्चा सुरु आहे. याचदरम्यान, अमित शहा यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविषयी मोठी घोषणा केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर मोठं भाष्य केलं. अमित शहा म्हणाले, 'राज्यात महायुतीचं सरकार येईल. विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर निर्णय घेण्यात येईल'.

राज्यात २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा जाहीर केला. यावेळी अमित शहा यांनी महाराष्ट्रात महायुतीचा सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला. अमित शहा पुढे म्हणाले, 'महायुतीने त्यांचा जाहीरनामा जाहीर केला आहे. तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

अमित शहा म्हणाले, 'आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे. विधानसभा निवडणुकीनंतर तिन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय घेतील'. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीत थेट सामना आहे.

दरम्यान, आज आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. या चौघांमध्ये झालेल्या बैठकीत १५-२० मिनिटं चर्चा झाल्याची माहिती हाती आली आहे. अमित शहांकडून महायुतीच्या प्रचाराचा आढावा घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विकासाच्या मुद्द्यांवर आणि जाहीरनाम्यावर प्रचारात भर द्या, असा संदेश बैठकीत देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT