plane
plane  Saam Tv
देश विदेश

New Delhi News : विमानात दारूच्या नशेत प्रवाशाचा धिंगाणा; सहप्रवाशासोबत केलं किळसवाणं कृत्य

Vishal Gangurde

नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वीच विमानात एका सुशिक्षित प्रवाशाने किळसवाणं कृत्य केल्याचा प्रकार समोर आला होता. एअर इंडियामधील लघवी प्रकरणाची जगभर चर्चा झाली होती. त्यानंतर असाच आणखी एक किळसवाणा प्रकार समोर आला आहे. न्यूयॉर्कवरून दिल्लीला येताना विमानात एकाने सहप्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. (Latest Marathi News)

अमेरिकेतून दिल्लीला येतं होतं विमान

अमेरिकेच्या (America) न्यूयॉर्कमधून एक विमान दिल्लीत येत होतं. या विमानात एक प्रवासी दारूच्या नशेत होता. हा प्रवासी २६ वर्षांचा असून आर्य वोहरा असे त्याचे नाव आहे. दारूच्या नशेत तरुणाने थेट सहप्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याचा किळसवाणा प्रकार केला आहे. या घटनेनंतर दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर लँडिंग करताना आर्य वोहराला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर आर्यने त्याने सांगितले की, 'मी झोपेत होतो, मला काहीच आठवत नाही'.

कोण आहे आरोपी?

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, अमेरिकेतून दिल्लीला येणाऱ्या विमानाने शुक्रवारी रात्री ९:१६ वाजण्याच्या सुमारास उड्डाण केलं. हे विमान (Airoplane) शनिवारी रात्री १०:१२ वाजण्याच्या सुमारास इंदिरा गांधी आंतराष्ट्रीय विमानावर उतरलं.

या प्रकारणातील आरोपी आर्य वोहरा हा अमेरिकेतील एका विद्यापीठातील विद्यार्थी आहे. त्याने दारूच्या नशेत आणि झोपेच्या गुंगीत त्याने सहप्रवाशाच्या अंगावर लघवी केल्याचा प्रकार केला. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी आर्य वोहराने अमेरिकेतील एका विद्यापाठातील विद्यार्थी आहे. हा आरोपी दिल्लीच्या डिफेंन्स कॉलनीत राहणारा आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breakfast Recipe: नाश्त्याला बनवा १० मिनीटांत तयार होणारे दडपे पोहे

Benefits of Chana Dal : चण्याची डाळ खा आणि चमत्कारिक फायदे मिळवा; आजच आहारात समावेश करा

Anita Date : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेने खरेदी केली नवी कोरी गाडी; अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Pune News: रणरणत्या उन्हात दुचाकीस्वार चक्कर येऊन पडला; चोरट्यांनी २३ लाखांची बॅग पळवली, पुण्यातील घटना

Children Lunch Box : लहान मुलांना दुपारच्या जेवणात द्या 'हे' स्वादिष्ट पदार्थ; १० मिनीटांत ताट करतील रिकामं

SCROLL FOR NEXT