Benefits of Chana Dal : चण्याची डाळ खा आणि चमत्कारिक फायदे मिळवा; आजच आहारात समावेश करा

Chana Dal Benefits : चण्याच्या डाळीत जास्त प्रमाणात प्रथिने आणि फायबर असते. याचे सेवन केल्याने आपली हाडे मजबूत होतात. शरीराला जास्तप्रमाणात ऊर्जा मिळते. त्यामुळे आपल्या आहारात कायम चण्याची डाळ खावी.
Benefits of Chana Dal
Benefits of Chana DalSaam TV

सध्या तरुण मुलं-मुली मोठ्याप्रमाणावर बाहेरचं फास्ट फूड खाणे पसंत करतात. मात्र त्याने शरीरला पोषक तत्व मिळत नाहीत. घरच्याघरी बनवली जाणारी डाळ आणि भात आहारात असणे गरजेचे आहे. त्यासह चण्याची डाळ देखील आहारात असायला हवी. चण्याची डाळ खाणे आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. अनेक व्यक्तींना याचे फायदे माहिती नाहीत. त्यामुळे आज या डाळीचे फायदे जाणून घेऊ.

Benefits of Chana Dal
Foods Avoid In Office Time : ऑफिस टाइममध्ये चुकूनही खाऊ नका हे पदार्थ, वाढेल वजन

हाडे मजबूत होतात

चण्याच्या डाळीत जास्त प्रमाणात प्रथिने आणि फायबर असते. याचे सेवन केल्याने आपली हाडे मजबूत होतात. शरीराला जास्तप्रमाणात ऊर्जा मिळते. थकवा अजिबात जाणवत नाही. त्यामुळे आपल्या आहारात कायम चण्याची डाळ खावी.

ब्लड शुगर कंट्रोल

चण्याच्याडाळीत सोडियम आणि आयर्न देखील असते. अनेक व्यक्तींना जेवणानंतर रक्तातील साखर वाढण्याच्या समस्या असतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी हमखास आहारात चण्याची डाळ खावी. त्याने तुमच्या रक्तातील साखर वाढत असल्यास ती कंट्रोलमध्ये राहते. सकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणात याचा समावेश करावा.

वजन कमी करण्यास मदत

अनेक व्यक्ती वजन कमी करण्यासाठी विविध गोष्टी करतात. मात्र वजन काही कमी होत नाही. चण्याची डाळ खाल्याने जास्त भूक लागत नाही. तसेच पोट देखील भरते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्हालाही मदत होईल. या डाळीमध्ये फायबर मोठ्याप्रमाणावर असल्याने अनेक जिम ट्रेनर देखील याचा सल्ला देतात.

उच्च रक्तदाब

अनेक व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. अशावेळी डोक्याची नस फाटण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे हा त्रास असलेल्या व्यक्तींना आयुष्यभर एकतरी गोळी खाविच लागते. मात्र याचा आपल्या किडणीवर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असाल तर आजपासूनच आहारात चण्याच्या डाळीचा समावेश करा.

Benefits of Chana Dal
Food for Diabeties : मधुमेहाचे रुग्ण करु शकतात 'या' गोड पदार्थांच सेवन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com