कोमल दामुद्रे
अनेकदा ऑफिसमध्ये स्नॅक्स किंवा जेवल्यानंतर आपल्याला झोप येऊ लागते.
दुपारच्या जेवणात काहीतरी हलके खा. तळलेले पदार्थ खाल्ल्याने पोट जड होते ज्यामुळे झोप येऊ लागते.
ऑफिसमध्ये मिड स्नॅक्समध्ये चिप्स, शेव यांसारख्या पदार्थांमध्ये मीठ असते. ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.
ऑफिसमध्ये काम करताना पेस्ट्री, कोल्ड्रिंक्स इत्यादी घेणे टाळा. त्यात असणारी साखर प्रिझर्व्हेटिव्हजमुळे आळस येतो. ज्यामुळे वजन वाढते.
चहा कॉफी प्यायल्याने शरीरात ऊर्जा वाढते. ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या होऊन तुम्हाला थकवा जाणवू शकतो.
या वेळेमध्ये नट, बिया आणि फळे खाऊ शकता ज्यामुळे आरोग्य चांगले राहिल.