जगातील दोन ताकदवाद देश अमेरिका आणि रशियामध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी शिवीगाळ केलीय. दोन्ही देशातील प्रमुख नेते एकमेकांवर टीका करत आहेत. अमेरिकेने रशियामधील विरोधी पक्ष अलेक्सी नवाल्नी यांच्या मृत्यूसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना जबाबदार धरलंय. नवाल्नी यांच्या मृत्यूप्रकरणावरून पुतीन यांच्यावर टीका करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पुतीन यांना वेडा म्हणत त्यांच्या नावाने शिवीगाळ केलीय.(Latest News)
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीकेला क्रेमलिनने उत्तर दिलंय.व्लादिमीर पुतीन यांच्यावर अशा शब्दात टीका करणं हे अपमानजक आहे. तर अमेरिकेच्या प्रमुख नेत्याने अशा असभ्य भाषेत टीका करणं हे चुकीचं असल्याचं क्रेमलिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह म्हणालेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अशा प्रकारची टीका करणं फक्त पुतीन यांच्यासाठीच नाहीतर जगातील इतर कोणत्याही नेत्यांसाठी सुद्धा अपमानजनक असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान बायडन यांनी याआधीही पुतीन यांच्यावर खालच्या पातळीवरील शब्दात टीका केलीय. त्यांनी पुतीन यांना चोर, हत्यारा, कसाई, अपराधी, गुन्हेगार, युद्धाचा गुन्हेगार म्हटलं होतं.
पुतीन यांनी बायडन यांच्याविरोधात कधीच अशा भाषेत टीका केली नाहीये. बायडन यांच्या प्रशासनाने पुतीन यांचे विधाने तपासून पाहावीत त्यांनी कुठे अशा असभ्य भाषेतील टीका सापडणार नसल्याचं क्रेमलिनचे प्रवक्ते म्हणालेत. जर राष्ट्राध्यक्ष पदावर बसलेली व्यक्ती अशा प्रकारची भाषा वापरत असेल तर ही लज्जास्पद आहे. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये बोलताना बायडन यांनी पुतीन यांना वेडा म्हणत शिवी दिली. त्यांनी आणुबॉम्बचे युद्ध होण्याची शक्यता वर्तवली होती. मानवतेच्या अस्तित्वासाठी हा धोका असल्याचं बायडन म्हणाले होते.
का पेटलं शाब्दिक युद्ध
रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रशियावर अमेरिकेने शाब्दिक हल्ला चढवलाय. बायडन यांनी पुतीन यांना नवाल्नी यांच्या मृत्यूसाठी पुतीन यांना जबाबदार धरलंय. रशियावर निर्बंध लादण्याचा विचार देखील केला जात असल्याचं सुद्धा बायडन म्हणालेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.