Donald Trump  saam Tv
देश विदेश

'मला समजले की भारतानं...' डोनाल्ड ट्रम्पचा आणखी एक खळबळजनक दावा; भारताचं कौतुक अन्..

Donald Trump News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की भारत रशियन तेल आयात थांबवत आहे. ट्रम्प यांनी याला "चांगले पाऊल" म्हणत कौतुक केले आहे.

Bhagyashree Kamble

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की भारत रशियन तेल आयात थांबवत आहे.

  • ट्रम्प यांनी याला "चांगले पाऊल" म्हणत कौतुक केले आहे.

  • ट्रम्प यांनी याआधी भारतावर २५ टक्के टॅरिफ टॅक्स लावण्याचा इशारा दिला होता.

  • मीडिया रिपोर्ट्सनुसार रशियन तेलाच्या सवलतीत घट आणि शिपिंग अडचणींमुळे आयात थांबवली आहे.

अलिकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ % टॅरिफ टॅक्स लादण्याची घोषणा केली. तसेच रशियाकडून तेल आयात करण्यासाठी दंड आकारणार असल्याचं सांगितलं. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी आणखी एक दावा केला आहे. भारत रशियन तेल आयात थांबवत असल्याच्या बातम्या ऐकल्या आहेत, हे एक चांगले पाऊल आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी एएनआयला सांगितलं, 'मला माहिती मिळाली आहे की, भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही आहे. मी जे काही ऐकले आहे, ते खरे आहे की नाही, हे मला काही माहित नाही. पण नक्कीच हे चांगले पाऊल आहे. पुढे काय घडतंय ते पाहू', असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं मॉस्कोच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांवर आर्थिक निर्बंध लादण्याचे प्रयत्न केले होते. त्यानंतर रशियन तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अमेरिका सातत्याने दबाव वाढवत होती. २०२२ साली रशियावर लादलेले पश्चिमी निर्बंध लागू झाल्यानंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयातदार देश म्हणून सवलतीच्या दरात मोठ्या प्रमाणात रशियन तेल खरेदी करत आहे.

दरम्यान, काही मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडे रशियन तेलाच्या सवलतीत घट झाल्याने आणि शिपिंगशी संबंधित अडचणींमुळे भारतीय सरकारी रिफायनर्‍या गेल्या आठवड्यात रशियन तेल खरेदी करू शकल्या नाहीत. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विश्वचषक विजेता कर्णधार भ्रष्टाचारात अडकला, कोणत्याही क्षणी अटक होणार? श्रीलंकेत वातावरण तापलं

Christmas Celebration : ख्रिसमस सेलिब्रेशन करायचे असेल तर, मुंबईतील माउंट मेरी चर्चला नक्कीच भेट द्या

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची ४०० कोटींकडे वाटचाल; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार? कपिलचा चित्रपट तिकीट खिडकीवर आपटला, वाचा कलेक्शन

Jio Recharge 2026: JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात, वाचा संपूर्ण प्लान...

SAI Recruitment: स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार २.०९ लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT