Crime News
Crime News Saam Tv

भाऊ HIV पॉझिटिव्ह, बहिणीला समजताच पतीसोबत भावाला संपवलं; परिसरात खळबळ

Karnataka Woman Kills Brother: चित्रदुर्गमध्ये २३ वर्षीय युवकाची त्याच्या बहिणीने आणि मेहुण्याने गळा दाबून हत्या केली, कारण तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे समजले.
Published on
Summary
  • चित्रदुर्ग जिल्ह्यात भावाची बहिण आणि मेहुण्याने हत्या केली.

  • मृत युवक नुकताच एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले होते.

  • सामाजिक अपमान आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या भीतीने हत्या केल्याची कबुली.

  • पोलिसांनी बहिणीला अटक केली असून दाजी फरार आहे.

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या भावाला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं समजताच त्याचीच गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. बहिणीनं आणि दाजीनं मिळून त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपी बहिणीला अटक केली आहे. मात्र, तिचा पती सध्या फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

२३ वर्षीय युवकाचा नुकताच अपघात झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान करण्यात आलेल्या रक्त तपासणीत तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. ही माहिती २५ जुलै रोजी बहिणीला समजल्यावर तिने आपल्या पतीसोबत मिळून भावाची हत्या करण्याचा कट रचला. ही धक्कादायक माहिती पोलीस चौकशीतून समोर आली.

Crime News
तेजस ठाकरेंचं शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; राजकीय वर्तुळात खळबळ

बहिणीने पोलिसांना काय सांगितले?

पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी आरोपी बहिणीला अटक केली आहे. पोलिसांना आरोपीनं सांगितलं की, 'भावाच्या आजाराची बातमी जर गावात पसरली, तर कुटुंबाला सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागू शकतो. तसेच, आईवडिलांपर्यंत जर हा विषाणू पोहोचला, तर त्यांचे आरोग्य धोक्यात येईल, कारण ते आधीच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत.

Crime News
दिल्लीहून परतताच शिंदेंचा ठाकरेंना दणका! साडे अकरा वाजता बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

याशिवाय, तिने असा दावाही केला की, तिचा भाऊ मोठ्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला होता. त्यामुळे तिनं भावाची हत्या केली असल्याची माहिती दिली. सध्या पोलिसांनी मृत तरूणाच्या बहिणीला अटक केली असून, तिचा आरोपी पती फरार आहे. पोलिसांकडून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com