Late-Night Political Earthquake
Late-Night Political EarthquakeSaam tv news

दिल्लीहून परतताच शिंदेंचा ठाकरेंना दणका! साडे अकरा वाजता बड्या नेत्यांचा पक्षप्रवेश

Late-Night Political Earthquake: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भव्य पक्षप्रवेश सोहळा गुरूवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पार पडला.
Published on
Summary
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये रात्री उशिरा मोठा पक्षप्रवेश पार पडला.

  • ठाकरे गट व काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करत मोठा राजकीय धक्का दिला.

  • मंत्री संजय राठोड यांनी १०,००० लोक पक्षप्रवेशासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.

  • काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये कैलास गोरंट्याल आणि सुरेश वरपुडकर यांचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर होते. परत येताच शिंदे गटात मोठा पक्ष प्रवेश झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पक्षाला दणका दिला आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतलं आहे. विशेष म्हणजे रात्री साडेअकरा वाजता हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या भव्य पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढली असल्याचं बोललं जात आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. दिल्ली दौऱ्यादरम्यान, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. गुरूवारी सायंकाळी ते परतले. यादरम्यान, रात्री साडे अकराच्या दरम्यान, यवतमाळ येथील ठाकरे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

Late-Night Political Earthquake
काँग्रेसच्या माजी आमदाराच्या मोलकरणीनं स्वत:वर गोळी झाडली; छतावर जाऊन आयुष्य संपवलं, कारण..

यावेळी शिंदे म्हणाले, 'अनेक सरपंच, अनेक जिल्हापरिषद सदस्य, माजी नगराध्यक्ष यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचा मी स्वागत करतो. या सर्वांच्या प्रवेशामुळे संजय राठोड यांची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. हा पक्ष अजून मजबूत होईल', असं एकनाथ शिंदे म्हणाले. 'खऱ्या शिवसेनेत, स्वगृही प्रवेश झाला हे मी जाहीर करतो', असंही शिंदे म्हणाले.

'१०,००० लोकांना शिंदे गटात प्रवेश करायचा आहे'

या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यावेळी मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'दोन्ही बंधू एकत्र आल्यानं शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश थांबतील, या सगळ्या बातम्या खरंतर निराधार आहेत. आज यवतमाळ जिल्ह्यातील २८ प्रमुख ठाकरे गटातील बड्या लोकांनी शिंदेंच्या नेतृत्वाला स्वीकारून पक्ष प्रवेश केला आहे. विविध पक्षातील १० हजार लोकांना शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करू इच्छित आहे', असंही संजय राठोड म्हणाले.

Late-Night Political Earthquake
म्हाताऱ्याचे अश्लील चाळे, बसमध्ये छातीला हात लावला अन्..; तरुणीने रागात नराधमाच्या कानाखाली जाळ काढला

माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा पक्षप्रवेश

जालना येथील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुरूवारी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का बसला आहे. दोन दिवसांपूर्वी परभणीचे माजी आमदार सुरेश वरपुडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com