
चित्रकूटमधील माजी आमदाराच्या निवासस्थानी २४ वर्षीय तरुणीने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.
मृत सुमन निषाद घरकाम करत होती, आणि पिस्तुलाने आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीम बोलावून तपास सुरू केला असून, कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.
सुमनच्या आत्महत्येमागील मानसिक तणाव, लग्नाची चिंता आणि घरगुती परिस्थिती तपासण्यात येत आहे.
मध्यप्रदेशच्या सतना जिल्ह्यातील चित्रकूट गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. चित्रकूटमधील काँग्रेसचे माजी आमदार निलांशु चतुर्वेदी यांच्या निवासस्थानी काम करणाऱ्या तरूणीनं स्वतःवर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी साधारण ३.३० वाजता घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुमन निषाद (वय वर्ष २४) असे तरूणीचं नाव आहे. ती घरकाम करीत होती. दरम्यान, घटनेच्या दिवशी ती घराच्या छतावर गेली. तेथेच तिने उजव्या कानाजवळ पिस्तूल ठेवून गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून इतर कर्मचाऱ्यांनी त्या दिशेनं धाव घेतली. तिला तातडीनं जवळील खासगी रूग्णालयात नेलं. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.
सतना पोलिस अधीक्षक आशुतोष गुप्ता यांनी सांगितले की, आत्महत्येसाठी वापरलेलं शस्त्र परवानाधारक असून ते माजी आमदार किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असण्याची शक्यता आहे. हे शस्त्र सुमनपर्यंत कसे पोहोचले याचा तपास सुरू आहे. घटनास्थळावरून पिस्तुल जप्त करण्यात आलं असून फॉरेन्सिक टीमच्या मदतीने चौकशी सुरू आहे. सुमनचा मोबाईल फोन आणि तिच्या संपर्कांचीही तपासणी सुरू आहे. अद्याप सुसाईड नोट सापडलेली नाही.
सुमन चित्रकूटच्या चौबेपूर भागातील रहिवासी होती. तिची आई गेल्या २५ वर्षांपासून घरकाम करीत होती. अलिकडेच सुमनची आई आजारी असल्याने सुमन तिच्या जागी काम करत होती.
लग्न ठरल्यानंतर मानसिक तणाव?
सुमनचं लग्न अलीकडेच ठरले होते. त्यानंतर ती मानसिक तणावात असल्याचं सांगितलं जात आहे. तिच्या वडिलांचा काही वर्षांपूर्वी विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता, त्यामुळे कुटुंब आर्थिक आणि मानसिक अडचणीत होते. पोलीस या बाजूनंही तपास करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.