MISSOURI PLANE CRASH: 12 KILLED INCLUDING 11 SKYDIVERS AND PILOT NEAR BUTLER AIRPORT Saam tv
देश विदेश

Plane Crash : भीषण अपघात! उड्डाणानंतर काही क्षणांतच विमान कोसळलं; दुर्घटनेत १२ जणांचा जागीच मृत्यू

America Plane Crash Accident News : अमेरिकेतील मिसौरी राज्यात बटलर मेमोरियल विमानतळाजवळ भीषण विमान अपघात झाला. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • अमेरिकेतील भीषण विमान अपघात

  • या भीषण दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू

  • अपघाताचा तपास सुरु

  • मृतांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

America Plane Crash Accident News Update अमेरिकेतून मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील मिसौरी राज्यात रविवारी झालेल्या भीषण विमान अपघातात १२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात मिसौरीमधील बटलर मेमोरियल विमानतळाजवळ घडला असल्याचे समोर आले आहे. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक प्रशासनाने बचाव आणि तपास कार्य सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमान उड्डाणानंतर काही वेळातच कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की विमानातील सर्व १२ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ११ स्कायडायव्हर्स आणि एका पायलटचा समावेश असल्याचे बेट्स काउंटी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. बटलर हे शहर मिसौरीमधील कॅन्सस सिटीच्या दक्षिणेस सुमारे ६० मैल अंतरावर आहे. अपघातानंतर तातडीने आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मात्र, विमान जळून खाक झाल्याने कोणालाही वाचवता आले नाही. दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

शासनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना, "विमानातील सर्व १२ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिली. दरम्यान, विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हवामानातील बदल, तांत्रिक बिघाड किंवा इतर कोणते कारण या दुर्घटनेमागे आहे का, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे.

अमेरिकेतील नागरी विमान वाहतूक प्रशासन आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा मंडळाचे (NTSB) अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे खरे कारण समोर येणार आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रशासनाने त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Saree Collection : स्टायलिश अन् कम्फर्टेबल! पावसाळ्यातही नेसा सुंदर साड्या, 'हे' लेटेस्ट कलेक्शन एकदा नक्की पाहा

Maharashtra News Live Update: यवतमाळात वंचितच्या 14 आंदोलकांवर गुन्हे दाखल

Veen Doghantali Hi Tutena : घट्ट मिठी, गालावर किस; समर-स्वानंदीच्या नात्यात रोमँटिक केमिस्ट्री सुरू, पाहा VIDEO

Earthquake : नाशिक पुन्हा भूकंपाने हादरले, मध्यरात्री २ तालुक्यात जमीन थरथरली अन्...; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Fatty Liver : लिव्हर खराब झाल्यास काय खावे? डॉक्टरांनी दिली सर्वात महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT