3 Indian Died In America Car Accident Saam TV
देश विदेश

America Car Accident: अमेरिकेमध्ये भीषण कार अपघातामध्ये ३ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, अनेक जण जखमी

3 Indian Died In America Car Accident: भरधाव कार उलटल्याने तीन भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन मुलींचा समावेश आहे. अपघातामध्ये जखमी आणि मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे वय १८ वर्षांच्या आसपास आहे.

Priya More

अमेरिकेमध्ये भीषण कार अपघातामध्ये (America Car Accident) ३ भारतीय- अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जॉर्जियाच्या अल्फारेटा येथे ही घटना घडली. भरधाव कार उलटल्याने तीन भारतीय-अमेरिकन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांमध्ये दोन मुलींचा समावेश आहे. अपघातामध्ये जखमी आणि मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे वय १८ वर्षांच्या आसपास आहे.

अल्फारेटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा अपघात जास्त स्पीड असल्यामुळे झाला. या अपघातामध्ये अल्फारेटा हायस्कूलमधील आर्यन जोशी, जॉर्जिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारी श्रिया अवसरला आणि अन्वी शर्मा यांचा मृत्यू झाला. तर जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आणि कारचालक रिथवाक ​​सोमपल्ली आणि अल्फारेटा हायस्कूलचा विद्यार्थी मोहम्मद लियाकथ हे जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले त्यामुळे कार नियंत्रणाबाहेर जाऊन झाडावर आदळली. आर्यन जोशी आणि श्रिया अवसरला या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर कारच्या मागच्या सीटवर बसलेली अन्वी शर्मासह इतर सर्वजण जखमी झाले. या सर्वांना नॉर्थ फुल्टन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी अन्वी शर्माचा मृत्यू झाला.

हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास अमेरिका पोलिसांकडून सुरू आहे. पण कारचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. अटलांटा जर्नल-कॉसिटीट्यूशनच्या रिपोर्टनुसार, श्रिया अवसरला यूजीए डान्स टीमची सदस्य होती. तर अन्वी शर्मा कॅपेला समुहासोबत गाणं गात होती. आर्यन जोशी अल्फारेटा हायस्कूलमध्ये सिनिअर होता आणि शाळेच्या क्रिकेट टीमचा सदस्य होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT