America Vs China: America Big Blow To China As Joe Bidden Imposes 100 % On Tarrif On Imports Of Chinese Goods Saam TV
देश विदेश

America VS China: अमेरिकेचा चीनला मोठा झटका; चिनी वस्तूंच्या आयातीवर १०० टक्क्यांपर्यंत कर लागू

Joe Bidden Impose 100% Tax on Chinese Product: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनला मोठा झटका दिला आहे. चीनमधून आयात होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांवर अमेरिकेने १०० टक्के कर लागू केला आहे.

Satish Daud

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनला मोठा झटका दिला आहे. चीनमधून आयात होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांवर अमेरिकेने १०० टक्के कर लागू केला आहे. याशिवाय सेमीकंडक्टरवर ५० टक्के, बॅटरीवर २५ टक्के, स्टील आणि ॲल्युमिनियमवर २५ टक्के आणि सौर पॅनेलवर ५० टक्के कर लावला आहे.

व्हाईट हाऊसच्या रोज गार्डनमध्ये राष्ट्राला संबोधित करताना ही बायडेन यांनी ही घोषणा केली आहे. बायडेन यांनी आरोप केला आहे की, "चीनी सरकारने वर्षानुवर्षे स्टील आणि ॲल्युमिनियम, इलेक्ट्रिक वाहने, सौर पॅनेल यासारख्या उद्योगांना निधी देण्यासाठी राज्याचा पैसा वापरला आहे".

"चीनने या सर्व उत्पादनांना मोठ्या प्रमाणात अनुदान दिले आहे. ज्यामुळे चिनी कंपन्या अधिक बळकट झाल्या आहेत. त्या जगातील इतर कंपन्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात उत्पादने तयार करतात. ज्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था बळकट होत असून इतर देश मागे पडत चालले आहेत".

जो बायडेन म्हणाले, "अमेरिका कोणत्याही प्रकारची कार खरेदी करणे सुरू ठेवू शकते. परंतु आम्ही चीनला या कारच्या बाजारावर अन्यायकारकपणे नियंत्रण ठेवू देणार नाही. मला चीनशी निकोप स्पर्धा हवी आहे, संघर्ष नाही".

चीन विरुद्ध २१ व्या शतकातील आर्थिक स्पर्धा जिंकण्यासाठी आम्ही इतर देशांपेक्षा आम्ही अधिक मजबूत आहोत, असंही बायडेन यांनी म्हटलंय. आम्ही पुन्हा देशात मोठी गुंतवणूक करणार असून चीनमधून आयात होणाऱ्या काही वस्तूंवर १०० टक्के आयातशुल्क लागू केले जाईल, असंही बायडेन यांनी स्पष्ट केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात राजकीय उलथापालथ; पाहा VIDEO

पुण्यातील IT पार्क हिंजवडीत भीषण अपघात, ट्रकची दुचाकीला धडक, तरूणी थेट चाकाखाली चिरडली

Beed Politics : बीडमधील ६ नगरपरिषदेच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट; कुठे असेल महायुती कुठे बिघाडी?

Maharashtra Live News Update: अकलूजमध्ये तिरंगी लढत; मोहिते पाटीलविरुध्द भाजप सामना

बीडमध्ये भाऊ -बहिणीची प्रतिष्ठा पणाला? संध्या देशमुखांच्या एन्ट्रीमुळे राजकीय तापमान वाढलं|VIDEO

SCROLL FOR NEXT