Amarnath
Amarnath Saam Tv
देश विदेश

बाबा बर्फानी यांचा यंदाचा पहिला फोटो, यात्रेला 30 जूनपासून सुरुवात

वृत्तसंस्था

जम्मू काश्मीर - कोरोना संकटानंतर तब्ब्ल दोन वर्षांनी यावर्षी अमरनाथ यात्रा पार पडणार आहे. 30 जून ते 11 ऑगस्ट दरम्यान ही यात्रा होणार आहे. या यात्रेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर गांदरबल पोलिसांच्या (Police) पथकाने यात्रेच्या गुहेपर्यंतच्या मार्गावरील सुरक्षेचे सर्वेक्षण केले आहे. यावेळी पथकानी बाबा बर्फानी यांचा पहिला फोटोही शेअर केला आहे.

हे देखील पाहा -

अमरनाथ गुहा काश्मीरच्या बर्फाळ पर्वतांमध्ये वसलेली आहे. या गुहेत बर्फापासून बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केली जाते. अमरनाथ गुहा हे शंकरजी यांच्या प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक आहे.

यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशनचा वापर करण्यात येणार आहे. ही यात्रा 30 जून पासून सुरु होणार आहे. तर 11 ऑगस्ट 2022 रोजी यात्रेची सांगता होणार आहे. तसेच अमरनाथ यात्रेला जाण्यास इच्छुक भाविकांसाठी 11 एप्रिलपासून नोंदणी सुरू झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

"आमच्या फुलाचं सौंदर्य खुललंय..."; 'लापता लेडिज' फेम अभिनेत्रीने Met Gala 2024 सोहळा गाजवला

Mumbai School News: मुंबईच्या प्रसिद्ध शाळेतील मुख्यध्यापिका पदावरून बडतर्फ; पॅलेस्टाइनवरील पोस्ट लाइक केल्याने कारवाई

Water Shortage : सीना कोळेगाव प्रकल्पात केवळ ८ टक्के पाणीसाठा; परंडा तालुक्यात सिंचनाचा प्रश्न गंभीर

Today's Marathi News Live : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन अर्जावर शुक्रवारी निकाल

Pune Crime News : किरकोळ कारणावरून पुण्यात तुफान हाणामारी; 20 जणांच्या टोळक्याचा दोघा तरुणांवर हल्ला, पहा Video

SCROLL FOR NEXT