Today's Marathi News Live : मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (6 may 2024): महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी, लोकसभेच्या राजकीय घडामोडी लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
8 May 2024 Latest Updates  PM Narendra Modi and Sharad pawar  overall Maharashtra
8 May 2024 Latest Updates PM Narendra Modi and Sharad pawar overall MaharashtraSaam TV

मालदीवरून प्रकाश आंबेडकरांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

मालदीव बेटावर भारतीय सैन्य होतं, भारतावर होणारा हल्ला रोखण्यासाठी ते सैन्य होतं, मात्र ही देशाची सुरक्षा मोदींनी काढली..

महाविकास आघाडीत हिम्मत नाही की मोदींना विचारावं, ते rss ला सुद्धा विचारू शकत नाहीत, त्यामुळं अशा महाविकास आघाडीच्या माणसाच्या हातात सत्ता जाता कामा नये

आज अतिरेकी धार्मिक राजकारण चालले आहे

आज मित्रराष्ट्र हे मित्रराष्ट्र राहणार नाहीत अशी परिस्थिती आहे

विदेशात राहणारे लोकं आता म्हणतात, आम्हाला आता भीती वाटतेय, की आम्ही ज्या देशातून आलोत त्या देशात परत जा म्हणून, कारण मोदींना जगाचा नेता व्हायचं आहे.

ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी पाच फरार आरोपींना अटक

ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी पाच फरार आरोपींना अटक

वेगवेगळ्या ड्रग्स सिंडिकेट प्रकरणी स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत NCB ची करवाई

निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विशेष मोहिम अंतर्गत करण्यात आली कारवाई

आर एल पटेल , डी राठोर, एस तोमर, एस चौधरी आणि एफ एम शेख नावाच्या आरोपींना अटक

छोटे पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील का? उद्धव ठाकरे शिवसेनेविषयी काय म्हणाले? 

निवडूण जाहीर होण्याआधीच मी संजोग वाघेरे पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती

त्यामुळें आता त्यांना प्रचार करण्याची गरज राहिली नाही

माझा नाव यांना पूर्ण नावही घेत येतं नाही

पवार साहेब म्हणाले हीते की छोटे पक्ष निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होतील

मात्र शिव सेना हा काही छोटा पक्ष नाही

बाप बदलण्याची वेळ माझी नाही तुमच्यावर ओढवली आहे

मोदींना रस्त्यावर उतरून रोड शो करावं लागतं आहेत

निवडणुकांशिवाय भाजप देश जिंकू पाहतोय; संजय सिंह याचा गंभीर आरोप

४०० पारला मतदार नक्की तडीपार करणार

२०१४ नंतर भाजपने मोदींनी वॉशिंग मशीन काढली

आज अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ सह अनेक भ्रष्टाचारी आज भाजप सोबत आहेत

ही शेवटची निवडणूक आहे समजा

ह्या वेळी भाजपाला मतदान केलं तर पुढें निवडणुकांच होणारं नाही

निवडणुकी विना भाजप देश जिंकू पाहत आहे

मोठी बातमी! वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांचा राजीनामा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त विधानांनी अडचणीत आलेल्या काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

पित्रोदा यांनी स्वतःच्या इच्छेने राजीनामा दिला असल्याची जयराम रमेश यांची माहिती

पित्रोदा यांचा राजीनामा पक्षाने स्वीकारला - रमेश

वाघाच्या झुंजीत बछड्याने गमावला जीव, चंद्रपूरमधील बल्लारपूर तालुक्यातील घटना

चंद्रपूरमधील बल्लारपूर तालुक्याच्या कळमना जंगलात वाघ मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ, वनखंड क्रमांक 571 मध्ये वाघाचा मादी बछडा मृतावस्थेत आला आढळुन, मादी वाघ बछड्याचे वय आहे 1 वर्ष, बछडयाचे शव ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरीता वन्यजीव उपचार केंद्र चंद्रपूर येथे रवाना, मृत बछडयाचे सिलबंद नमुने रासायनीक विश्लेषणाकरीता वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविणार, वाघाच्या झुंजीत हा मृत्यू ओढवल्याची प्राथमिक माहिती.

नागपूर जिल्हा चौथ्यांदा हादरला, बुधवारी 4 वाजता पुन्हा 2.4 तीव्रतेचे जाणवले भूकंपाचे धक्के

नागपूर जिल्ह्यात बुधवारी दुपारी 4 वाजताच सुमारास पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के नोंदवल्या गेलेत..

यावेळी नागपूर जिल्ह्यातील कामठी परिसरात 2.4 तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले आहेय...

हे धक्के पाच किलोमीटर खोल नोंदवल्या गेले असून यापासून भीतीचे कारण नाही...

यापूर्वी पारशवनी उमरेड आणि आता कामठी परिसरता भूकंपाचा धक्क्याची नोंद झाली आहे.

साक्री तालुक्यात वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

साक्री तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार बॅटिंग बघावयास मिळाली आहे, सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे साक्री सुरत महामार्गावरील झाड रस्त्याच्यामध्ये कोसळले आहे.तब्बल अर्धा ते पाऊण तास चाललेल्या दमदार पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली असून, अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात निर्माण गारवा झाल्याने उकडापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बेवारस मुलांचं संगोपन करणाऱ्या शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर

विकलांग आणि बेवारस मुलांचं संगोपन करण्याचं काम मागच्या १८ वर्षांपासून करणाऱ्या अमरावतीच्या शंकरबाबा पापळकर यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय... उद्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार शंकर बाबा यांना प्रदान करण्यात येणार आहे...

पुण्यात विमाननगर परिसरातील सोसायटाला लागली आग

पुण्यात विमाननगर, गिगा स्पेस जवळ, न्याती एक्सप्रेस सोसायटीमध्ये आग व मोठ्या प्रमाणात धूर

अग्निशमन दलाकडून ३ फायरगाड्या व एक उंच शिडीचे वाहन (ब्रॉन्टो) रवाना. आग अटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू

विमान नगर येथील आग आटोक्यात असून सद्यस्थितीत धूर मोठ्या प्रमाणात आहे

संधी मिळेल त्यावेळी शिरुरला मंत्रिपदाची संधी देऊ; शरद पवारांचं आश्वासन

- आंबेगाव ला अनेक वेळा मंत्रीपदाची संधी दिली शिरुरची नेहमी तक्रार होती मात्र यावेळी शिरुर चा विचार होईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला

- चार पैकी तीन जणांनी रस्त्या बदलला

- यापुढे संधी मिळेल त्यावेळी शिरुरला मंत्री पदाची संधी देऊ

योद्धा शरण जात नाही, म्हणून त्याला बदनाम केलं जातं; अमोल कोल्हे

बारामतीतून काही पाव्हणे आलेत, बारा बारा सभा घेतायेत, आता कळल त्यांचे प्रदेशाध्यक्ष येतायेत

एका शेतकऱ्यांच्या पोराला पाडायला सगळे राष्ट्रीय नेते एकत्र आलेत

कांदा निर्यातबंदी उठवली, अस कोणी तरी सांगेल, पण परत एकदा धूळफेक केली, आपल्याला हातोहात फसवलं आहे

महायुतीचे उमेदवार आले की विचारा खोटी आशा दाखवून तोंडाला पान पुसली

याच भागात येऊन रामलिंग महाराजांची खोटी शपथ कोणी घेईल असं वाटलं नव्हतं

माझा काहीही संबंध नाही असं सांगितलं, मग कशाला पोराला व्हिडीओ करायला लावला

काल त्यांच्या चिरंजिवांनी व्हिडीओ केला

सत्तेतून पैसे आणि पैश्यातून सत्ता, चंद्रशेखर बावनकुळेंचा काँगेसवर आरोप

पृथ्वीराज त्याच्या काळात असे करत असतील म्हणून त्यांना तसे वाटते,रोखे रक्कम रेकॉर्ड वर असते,या आरोपात तथ्य नाही,काँग्रेस सत्ता पासून पैसे आणि पैश्यापासून सत्ता अस काँगेस ने केलं आहे.

Lok Sabha Election : आदित्य ठाकरे यांचा उद्या मावळ लोकसभा दौरा

मावळ लोकसभेचे उमेदवार संज्योग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांच्या उद्या दोन सभा

सायंकाळी 4 वाजता खारघर आणि कामोठे येथे बाईक रॅलीच आयोजन तर रात्री 6.30 वाजता कर्जत येथे पहिली सभा

तर रात्री 8.30 वाजता आदित्य ठाकरे यांची उरण येथील नाना साहेब धर्माधिकारी मैदानात सभा

उद्धव ठाकरे यांची आज मावळ येथे सभा होत असताना उद्या आदित्य ठाकरे उर्वरित मावळ लोकसभेत प्रचार करणार

Maharashtra Politics 2024 : देवेंद्र फडणवीस यांना शिरपूरमध्ये आदिवासी कोळी बांधवांनी दाखवले काळे झेंडे

देवेंद्र फडणवीस यांना शिरपूर येथील करवंदनाका येथे आदिवासी कोळी बांधवांनी दाखविले काळे झेंडे

नंदुरबार लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचार सभेसाठी शिरपूर मध्ये आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला करवंद नाका परिसरात दाखविण्यात आले काळे झेंडे

2014 मध्ये आदिवासी कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्न सरकार आल्यावर तात्काळ सोडवू असे फडणवीसांनी आश्वासन दिले होते,

या आश्वासनाला दहा वर्षे उलटून देखील अद्यापही या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याच्या रोशा मधून फडणवीसांना दाखवण्यात आले काळे झेंडे..

काळे झेंडे दाखवणाऱ्या निषेध कर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात...

पुण्यात इंडिया आघाडीची बैठक सुरू, यशोमती ठाकूर, सुनील केदार यांची निरीक्षक म्हणून नेमणूक

बैठकीसाठी राष्ट्रवादीचे खासदार वंदना चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजित अभ्यंकर, इतर नेते उपस्थित

काँग्रेस पक्षाकडून आमदार यशोमती ठाकूर,आणि आमदार सुनील केदार यांची निरीक्षक म्हणून नेमणूक

पुणे लोकसभा मतदारसंघातील सहाच्या सहा मतदारसंघात आमदारांची निरीक्षक म्हणून नेमणूक.

विधानसभा मतदारसंघात आता काँग्रेसचे आमदारांचा असणार लक्ष...

राज्यातील काँग्रेस पक्षातील आमदार पुण्यातील सहाच्या सहा मतदार संघावर ठेवणार लक्ष..

 Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन अर्जावर शुक्रवारी निकाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन अर्जावर शुक्रवारी निकाल येणार

सुप्रीम कोर्टाची महत्वाची टिपण्णी

केजरीवाल यांना जामीन मिळणार का हे पाहणं महत्वाच

मुंबईची विमानसेवा उद्या राहणार बंद, मोठं कारण आलं समोर

उद्या सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई विमानसेवा बंद असणार

दोन्ही रनव्हे उड्डाणसेवा राहणार बंद

मान्सून च्या अगोदरच्या दुरुस्ती साठी राहणार बंद

गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये ३.१५ वाजता जाणवले भूकंपाचे धक्के  

गुजरातच्या सौराष्ट्र मधे भूकंपाचे धक्के

३.४ रिष्टर स्केल चा जाणवला धक्का

३.१५ वाजता जाणवला धक्का

म्हणून शिवसेना पक्ष कधीच राज्यात स्वबळावर सत्तेत आला नाही; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

- विजय करंजकर म्हणाले, की तिकिटासाठी पैसे घेतले नाही

- *तुम्ही कसे पैसे घेणार पैसे घेण्याचा अधिकार तिकडे ( उद्धव ठाकरे )

- त्यामुळेच शिवसेना पक्ष कधीच राज्यात स्वबळावर सत्तेत येऊ शकला नाही

- अनेक चांगल्या नेत्यांना तुम्ही घालवलं, शेवटी एकनाथ शिंदेला देखील घालवलं

- मला काय हवं होत, तर मला फक्त प्रेम हवं होत

- लोकसभेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री राहिलेल्या मनोहर जोशी यांना स्टेजवरून खाली उतरवल

- कसा पक्ष वाढणार, कसा पक्ष मोठा होणार?

- रामदास कदम यांचंही तसच होणार होत, मी त्यांना म्हटलं अजिबात येऊ नका

- कुणी मोठं होत असेल, तर त्यांना मोठं होऊ दिलं नाही

- चांगलं भाषण करणाऱ्यांना बोलू दिलं जात नव्हत

- श्रीकांत म्हणाला राजा का बेटा राजा नही बनेगा, जो काम करेगा वो राजा बनेगा, असं काम आपल्या पक्षात

पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणांमध्ये तुफान हाणामारी

पुणे शहरातील महंमदवाडी परिसरात असलेल्या गंगा फ्लोरेंटीना सोसायटी बाहेर किरकोळ कारणावरून तरुणाततुफान हाणामारी

वीस जणांच्या टोळक्याचा दोघा तरुणावर जीवघेणा हल्ला.

⁠हल्ल्याचा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल.

वाहनांच्या तेडफोडीनंतर रस्त्यावर राड्याची घटना

Pune Fire News: खराडीत गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाकडून एकुण ७ वाहने रवाना

पुणे

पुण्यात खराडीत एका गोडाऊनमध्ये आगीची घटना

पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून एकुण ७ वाहने रवाना

आग विझवण्याचे काम सुरू

महापालिका अतिक्रमणचे गोडाऊन असल्याची माहिती

Salman Khan News : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी मंजूर

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण

आरोपी विकी गुप्ता आणि सागर पाल यांना न्यायालयीन कोठडी मंजूर

सलमानच्या घरावर गोळ्या चालल्याचा आहे दोघांवर आरोप

मुंबई सत्र न्यायालयाच्या मोक्का कोर्टाने पाठवले दोघांना न्यायालयीन कोठडीत

राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर

पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर

मुंबई, नाशिक व कोकण विभागाच्या १० जूनला मतदान

मुंबई व कोकण पदवीधर तसेच मुंबई व नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर

राज्यात चार जागांसाठी निवडणूक जाहीर

चार आमदारांचा कार्यकाळ ७ जुलैला संपणार

Pm Narendra Modi : काँग्रेसने अदानी-अंबानीकडून किती पैसा घेतला? PM मोदींची टीका

निवडणूक घोषित झाल्यापासून कॉंग्रेसने टीका करणं बंद केली आहे - पंतप्रधान मोदी

आधी राहुल गांधी ४-५ उद्योगपतींवर टीका करायचे, आता ती टीका बंद केली - पंतप्रधान मोदी

अदानी अंबानीकडून कॉंग्रेसने किती पैसा घेतला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधी यांना सवाल

Junnar : बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलगा ठार, जुन्नर तालुक्यातील घटना

जुन्नर तालुक्यात पुन्हा चिमुकला बनला बिबट्याचा शिकार

घरासमोर अंगणात खेळत असताना बिबट्याने केला हल्ला

अंगावर काटा आणणा-या बिबट्याच्या हल्ल्याने संताप

जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथे घडली घटना

यात्रेसाठी आलेल्या आठ वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला करत केले ठार

रुद्र महेश फापाळे असे वय ८ बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलाचे नाव

Priyanka Gandhi : नंदुरबारमधील प्रियंका गांधी यांची सभा रद्द

नंदुरबारमधील प्रियंका गांधी यांची सभा रद्द झाली आहे.

नंदुरबारला १० तारखेला सभा होणार होती.

Beed News : बीड जिल्ह्यात आज दोन दिग्गज नेत्यांच्या सभा

बीड लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यातील मतदान हे 13 मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील निवडणुकीचे वातावरण चांगलंच तापलं आहे. काल पंकजा मुंडेंसाठी नरेंद्र मोदींची जाहीर सभा झाली, त्यानंतर आज बीड जिल्ह्यात 2 दिग्गज नेत्यांच्या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यासाठी जयंत पाटील यांची सभा होणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगेंसाठी प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा होणार आहे.

Mumbai News : नामांतराच्या वादावार राज्य सरकारला मोठा दिलासा; हायकोर्टाने सर्व याचिका फेटाळल्या

नामांतराच्या वादावार राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव नामांतराच्या सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्या आहेत.

Ajit Pawar : बारामतीनंतर अजित पवारांची शिरुरमध्ये फिल्डिंग; मतदारसंघात सभांचा धडाका

बारामती लोकसभेचे मतदान संपल्यानंतर शरद पवार आणि अजित पवारांनी शिरुर लोकसभेवर लक्ष केंद्रीत करत सभांचा धडाका लावला आहे.आज सकाळी अजित पवार लांडेवाडी येथे दाखल झाले. शिवाजी आढळराव पाटील यांच्यासाठी अजित पवारांनी एकाच दिवसात चार ठिकाणी जाहीर सभा लावण्यात आल्या आहेत. तर अमोल कोल्हेंसाठी शरद पवारांची एक जाहिर सभा उद्या होणार आहे.

lok Sabha Election : कांदिवलीत निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई; कारमधील १२ लाखांची रोकड जप्त

मुंबईच्या कांदिवली पश्चिमेत महावीरनगर परिसरामध्ये निवडणूक भरारी पथकाची मोठी कारवाई

भरारी पथकाकडून काल रात्री महावीरनगर परिसरामध्ये एका कारमधून 12 लाख रुपयांची रोकड घेऊन जात असताना दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बारा लाख रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.

निवडणुकीत मतदारांना आमिष दाखवण्यासाठी वापरले जात होते का? पैसे कोणाचे आहे? कुठे घेऊन जात होते, या संदर्भात अधिक तपास कांदिवली पोलिस आणि निवडणूक कर्मचारी करत आहेत.

Sharad Pawar News : प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात; शरद पवारांचं मोठं भाकित

शरद पवार काय म्हणाले?

'येणाऱ्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात. शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना वर्तवलं भाकीत "2024 च्या निकालानंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत जातील, तर काही पक्ष थेट काँग्रेसमध्ये विलीन होतील, असं भाकीत शरद पवारांनी वर्तवलं आहे.

BJP News : भाजप नेत्यांकडून राज्यात सभांचा धुरळा

भाजप नेत्यांकडून आज राज्यात सभांचा धुरळा पाहायला मिळणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज सायंकाळी जालन्यात घेणार जाहीर सभा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज चार सभांचे नियोजन

नंदुरबार, जळगाव, जालना व संभाजीनगर मध्ये फडणवीसांची तोफ धडाडणार

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही पुण्यात तीन ठिकाणी सभा

पुण्यातील बिबवेवाडी, मार्केट यार्ड, मुकुंद नगर येथे बावनकुळे विरोधकांचा समाचार घेणार

Mumbai News : मुंबई उपनगरात २७२८ ज्येष्ठ नागरिक घरबसल्या मतदान करणार

मुंबई उपनगरात 2728 ज्येष्ठ नागरिक घरबसल्या मतदान करणार

मुंबई उपनगरात वयाची 85 पूर्ण केलेल्या एकूण 95 हजार 188 मतदारांची नोंद

तर दिव्यांग मतदारांची संख्या 13821

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग अशा एकूण 2728 मतदारांनी घरबसल्या मतदान करण्याचा निवडला मार्ग

मतदारांच्या सोयीच्या वेळेनुसार संपूर्ण मतदान केंद्र घरी नेऊन मतदान करून घेणार

11 आणि 12 मे रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाणार

घरबसल्या मतदारांना ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदानाची सुविधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com