Mumbai School News: मुंबईच्या प्रसिद्ध शाळेतील मुख्यध्यापिका पदावरून बडतर्फ; पॅलेस्टाइनवरील पोस्ट लाइक केल्याने कारवाई

Somaiya School Mumbai: सोमय्या स्कूल प्रशासनाने ही कारवाई केली आहे. आमच्या मुल्यांमधील एकता आणि समानता यांच्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं शाळा प्रशासनाने म्हटलं आहे.
Mumbai School News
Mumbai School NewsSaam TV

मुंबईच्या एका नामांकीत शाळेतील मुख्यध्यापिकांना तडकाफडकी पदावरून बडतर्फ करण्यात आलं आहे. परवीन शेख असं मुख्यधापिका महिलेचे नाव आहे. सोमय्या स्कूल प्रशासनाने ही कारवाई केली आहे. आमच्या मुल्यांमधील एकता आणि समानता यांच्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असं शाळा प्रशासनाने म्हटलं आहे.

Mumbai School News
Delhi School News : दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट मोडवर

नेमकं प्रकरण काय?

मुंबईच्या विद्याविहार परिसरातील सोमय्या या शाळेत हा प्रकार घडला आहे. मुख्याध्यापिका शेख यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी पॅलेस्टाईन तसेच हमास - इस्रायलमधील उद्धावरील पोस्ट लाइक केली होती. त्यानंतर शाळा प्रशासनाने तडकाफडकी हा निर्णय घेतला.

शाळा व्यवस्थापनाने याबाबत २ मे रोजी शेख यांना नोटीस बजावत राजिनामा देण्यास सांगितले होते. तसेच शाळेकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू होता. दरम्यान, मंगळवारी शाळेकडून पुन्हा दुसरी पोस्ट शेअर करत शेख यांना बडतर्फ करत असल्याचं म्हटलं.

शाळा प्रशासनाने यावर पुढे म्हटलं की, शेख यांनी आमच्या नियमांचे उल्लंघन केले. आमच्या सर्वसमावेशक मुल्यांची तडजोड केली. आमची शाळा विद्यार्थ्याला ज्ञानाकडे नेण्याचा मार्ग आहे. येथे सर्व संस्कृतीला समान मान्यता दिली जाते. त्यामुळे काळजीपूर्वक विचार केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतल्याचं शाळा प्रशासनाने म्हटलंय.

आम्हाला विश्वास आहे की, तरुणांच्या मनाचे त्यांच्या विचारांचे आम्ही रक्षण करू. तसेच सर्वोच्च स्थानावर टिकवून असणाऱ्या वातावरणात त्यांचे पालनपोषण करू. ही परंपरा मोडली जाऊ नये यासाठी सोमय्या स्कूल प्रशासनाने शाळेच्या बाबतीत हा निर्णय घेतला आहे.

Mumbai School News
Sanju Samson Wicket: संजू सॅमसन आऊट की नॉट आऊट? अंपायरच्या निर्णयानंतर पेटला वाद - Video

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com