Sanju Samson Wicket: संजू सॅमसन आऊट की नॉट आऊट? अंपायरच्या निर्णयानंतर पेटला वाद - Video

Sanju Samson Catch Controversy: या सामन्यात संजू सॅमसन बाद झाल्यानंतर मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
sanju samson wicket controversial decision cost rajasthan royals vs delhi capitals amd2000
sanju samson wicket controversial decision cost rajasthan royals vs delhi capitals amd2000twitter

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने शानदार फलंदाजी केली. त्याने अरुण जेटली स्टेडियमवर चौकार षटकारांचा पाऊस पाडत ८४ धावा चोपल्या. मात्र ही खेळी व्यर्थ गेली,कारण राजस्थानला हा सामना २० धावांनी गमवावा लागला आहे. दरम्यान संजू सॅमसन १६ व्या षटकात बाद होऊन माघारी परतला. तो बाद झाल्यानंतर अंपायरशी वाद घालताना दिसून आला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

संजू सॅमसन बाद झाल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट कुमार संगकारा आणि मालक पार्थ जिंदाल देखील संताप व्यक्त करताना दिसून आले. हा वाद वाढतच चालला होता. अखेर संजूला मैदान सोडावं लागलं आणि हाच या सामन्यातील टर्निंग पॉईंट ठरला. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण.

sanju samson wicket controversial decision cost rajasthan royals vs delhi capitals amd2000
T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी सूर्याचा मास्टरप्लान! IPL दरम्यान करतोय खास सराव; स्वत:च केला खुलासा

या सामन्यात धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसन आक्रमक फलंदाजी करत होता. त्यावेळी १६ वे षटक टाकण्यासाठी आलेल्या मुकेश कुमारने त्याला बाद केलं. मुकेशने टाकलेल्या स्लो चेंडूवर संजू सॅमसनने लाँग ऑनच्या वरून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्रा सीमारेषेच्या अगदी जवळ असलेल्या शाई होपने शानदार झेल टिपला. त्याचा हा झेल पाहून असं वाटत होतं की, त्याचा पाय सीमारेषेला स्पर्श झाला आहे. त्यानंतर अंपायरने हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवला. तिसऱ्या अंपायरने पाहिलं आणि तो नाबाद असल्याचा निर्णय दिला.

मोठ्या स्क्रीनवर अंपायरने त्याला बाद घोषित केल्याचा निर्णय तर दिला. मात्र प्रकरण इथंच थांबलं नाही. तो बराच वेळ अंपायरसोबत चर्चा करताना दिसून आला. संजूला बाद घोषित केल्यामुळे संघमालकासह कुमार संगकारा देखील संताप व्यक्त करताना दिसून आले. तर दिल्ली कॅपिटल्स संघाचे मालक पार्थ, संजूला बाद असल्याचा इशारा करताना दिसून आले. शेवटी संजू सॅमसनला अंपायरचा निर्णय मान्य करावा लागला.

sanju samson wicket controversial decision cost rajasthan royals vs delhi capitals amd2000
RCB Playoff Scenario: राजस्थानच्या पराभवाने RCB चं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी एकमेव पर्याय शिल्लक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com