बेडशीट खरेदी करताना तुम्ही देखील या चुका करत आहात का?

बेडशीट खरेदी करताना अनेकदा आपण फक्त रंग आणि प्रिंट पाहतो. यासोबत इतर गोष्टी पाहाणे आवश्यक आहे.
How to choose bedsheet
How to choose bedsheetब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : आठवड्यातून एकदा बेडशीटवरची चादर धुणे जितके गरजेचे आहे तितके गरजेचे आहे ती तीन महिन्यातून एकदा बदलणे. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्रीची (Night) झोप चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे आणि शांत झोपेसाठी आरामदायी गोष्टी असणे आवश्यक आहे. परंतु, शांत झोपेसाठी फक्त शांतता, गादी किंवा स्वच्छ पलंग असणे जितके आवश्यक आहे तितकेच आवश्यक आहे सुंदर आणि आरामदायी बेडशीट.

हे देखील पहा -

अनेकदा बाजारात खरेदीला जाताना आपण कोणत्याही प्रकारची बेडशीट खरेदी करतो पण तितके पुरेसे नसते. बेडशीट खरेदी करताना अनेकदा आपण फक्त रंग आणि प्रिंट पाहतो, पण यासोबत फॅब्रिकसह आणि इतर अनेक गोष्टी पाहाणे आवश्यक आहे. बेडशीट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी बेडशीट खरेदीसाठी काही महत्त्वाच्या टिप्स (Tips) जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

१. साधारणपणे, बेड अनेक प्रकाराचे येतात. बहुतेकांना किंग साइज, क्वीन साइज बेड आदी माहिती असते, परंतु बेडशीट खरेदी करण्यापूर्वी गादीची लांबी, रुंदी आणि खोली यासह बेडचा आकार मोजणे आवश्यक आहे. हे देखील लक्षात ठेवायला हवे की, बेडशीट धुतल्यानंतर ती लहानही होऊ शकते.

How to choose bedsheet
Benefits of Sweet lemon: मोंसबीच्या सालींचा उपयोग असा ही !

२. बेडशीटमध्ये फॅब्रिकचे अनेक प्रकार दिसून येतात. सॅटिन, कॉटन (Cotton), लिनेन, सिल्क याप्रकारात बेडशीट बाजारात उपलब्ध आहेत. यातील बरेचसे कापड जास्त काळ टिकण्यासाठी सिंथेटिक कापडांमध्ये मिसळले जातात. अशा परिस्थितीत, फॅब्रिक ओळखणे आणि त्यात भेसळ नाही हे शोधणे महत्वाचे आहे. प्युअर सिल्क, साटन किंवा कॉटनपासून बनवलेल्या बेडशीट्स चांगल्या मानल्या जातात.

३. ऑनलाइन खरेदी करत असाल किंवा कोणत्याही दुकानातून बेडशीट खरेदी करत असाल तर रिटर्न पॉलिसीबद्दल नक्कीच जाणून घ्याला हवे. अनेक ब्रँड निर्धारित वेळेत सामान परत करण्याची सुविधा देतात. त्यासाठी ऑनलाइन बेडशीट खरेदी केल्यानंतर तीचा रंग, कपडा तपासून पहा

४. कोणत्याही बेडशीटची खरी ओळख त्याच्यावर वापरलेल्या धाग्यांनी समजून येते. तसेच त्यात वापरलेल्या थ्रेड्सची संख्या जितकी जास्त असेल तितकी शीट्स मऊ असेल. कमी धाग्यांची बेडशीट पातळ असते आणि ती सहजपणे फाटते. म्हणून, ज्या शीटमध्ये धागे जास्त आहेत तेच खरेदी करा.

या गोष्टी लक्षात ठेवून बेडशीटची खरेदी करा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com