Pune Crime News : किरकोळ कारणावरून पुण्यात तुफान हाणामारी; 20 जणांच्या टोळक्याचा दोघा तरुणांवर हल्ला, पहा Video

Pune Crime News Video : पुणे शहरातातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महंमदवाडी परिसराती गंगा फ्लोरेंटीना सोसायटी बाहेर किरकोळ कारणावरून तरुणांमुध्ये ततुफान हाणामारी झाली.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam Digital

पुणे शहरातातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महंमदवाडी परिसरात गंगा फ्लोरेंटीना सोसायटी बाहेर किरकोळ कारणावरून तरुणांमुध्ये ततुफान हाणामारी झाली. तब्बल वीस जणांच्या टोळक्याने दोघा तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्याच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाहनांच्या तेडफोडीनंतर आता भर रस्त्यात तरुणाच्या हाणामारीची घटना समोर आली आहे.

मद्यधुंद महिलांचा विरारमध्ये राडा

विरारच्या पश्चिमेकडील गोकुळ टाऊनशिपमधील एका बारमध्ये तीन महिलांनी धिंगाणा घातला. बदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांनाही अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. इतकचं नाही तर चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी या तीनही महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सदर महिला एका रेस्टॉरंट बारमध्ये दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचा फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र त्या महिलांनी पोलिसांशीही हुज्जत घालून शिवीगाळ करत दमदाटी केली. एका महिलेने पोलीस अधिकाऱ्याच्या गणवेशाला पकडून ओढलं आणि धक्काबुक्कीही केली. पोलिसाच्या उजव्या हाताच्या मनगटाला व कोपराला जोरात चावा घेतला आहे.

Pune Crime News
Crime News: मॅट्रिमोनिअल साइट्सवर ओळख; ७ महिलांशी लग्न आणि तिघींवर अत्याचार, शिक्षिकेमुळे पितळ उघडं पडलं

पवई पोलिसांनी जप्त केली ४.७० कोटींची रोकड

पवई पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली आहे. संशय आल्यामुळे कॅश व्हॅनमधील ४.७० कोटीची रोकड जप्त केली आहे. ६ मे रोजी रात्री पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गार्डन बीट चौकीजवळ नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी या व्हॅनला अडवलं होतं. चौकशी केली असता बारकोड मिस मॅच झाला. त्यामुळे पोलिसांनी व्हॅनसह रोकड जप्त केली असून आयकर विभागाकडून अधिक तपास सुरू आहे.

Pune Crime News
Ratnagiri News : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, रत्नागिरीत 3 कोटींची रोकड जप्त.. | Marathi News

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com