Allahabad High Court Says Adult Daughter Cannot Be Forced to Live With Parents AI Image
देश विदेश

High Court: मुलीनं कुठे राहायचं हा तिचा निर्णय, आईवडील सक्ती करू शकत नाहीत; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Allahabad High Court Big Decesion News : सज्ञान मुलीला तिच्या इच्छेविरुद्ध पालकांसोबत राहण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकत नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयानं एका प्रकरणात हा निर्णय दिला आहे.

Alisha Khedekar

  • सज्ञान व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार

  • स्वतःच्या इच्छेने कुठे आणि कोणासोबत राहायचे हे ठरवण्याच्या अधिकारावर न्यायालयाने भर दिला

  • मुलीला आईवडिलांसोबत राहण्यासाठी दबाव टाकला जाऊ शकत नाही

पालकांनो, आता जर तुमच्या सज्ञान मुलीला तुमच्यासोबत राहायचं नसल्यास तुम्ही तिच्यावर दबाव टाकू शकत नाही. कारण एका घटनेत अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. एखादी व्यक्ती सज्ञान असेल आणि ती स्वतःच्या इच्छेने कुठे व कोणासोबत राहायचे हे ठरवत असेल, तर केवळ ती मुलगी आहे म्हणून तिच्यावर दबाव आणता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एका महिलेनं २५ वर्षांच्या मुलीला न्यायालयात हजर करण्याचे निर्देश द्यावेत आणि तिचा ताबा मिळावा, यासाठी अलाहाबाद उच्च न्यायालयात ‘हेबियस कॉर्पस’ याचिका दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी मुलीला न्यायालयात हजर केले.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने मुलीशी थेट संवाद साधला. त्यावेळी तिनं आपण दिल्लीमध्ये स्वतःच्या इच्छेने राहत असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपल्याला कोणत्याही व्यक्तीने बेकायदेशीरपणे डांबून ठेवलेले नाही, असेही तिने न्यायालयासमोर सांगितले. आईसोबत परत जाण्याची तिची इच्छा नसल्याचेही स्पष्टपणे सांगितले.

न्यायमूर्ती संदीप जैन यांनी यावेळेस स्पष्ट केले की, केवळ जन्मदाते आईवडील आहेत म्हणून कोणत्याही वयात आलेल्या व्यक्तीला इच्छेविरुद्ध एखाद्या व्यक्तीबरोबर राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. त्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या पसंतीच्या ठिकाणी आणि पसंतीच्या व्यक्तीसोबत राहण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे.” या निर्णयामुळे सज्ञान व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याला आणि स्वतःचे निर्णय घेण्याच्या अधिकाराला न्यायालयाने पुन्हा एकदा महत्त्व दिल्याचे स्पष्ट झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी राहुल गांधी दाखल

Shiv Sena Case live: शिवसेना पक्ष अन् चिन्ह कुणाचे? सुप्रीम कोर्टातून महत्वाची अपडेट समोर; शिंदेंच्या वकिलांचा मोठा युक्तीवाद

मृत्यूपत्रात मिळालेली जमीन-मालमत्ता नावावर कशी कराल? सरकार दरबारी काय कराल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया अन् कागदपत्रे

Best Home Remedy for Jaundice: कावीळ झाल्यावर बेलाच्या पानांचा प्रभावी उपाय करा; काही दिवसांतच दिसेल फरक

Pitru Paksha : तुपाचा खमंग स्वाद अन् गुळाची गोडी; पितृपक्षात बनवा गव्हाची लापशी, प्रसादासाठी एकदम सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT