दूधामध्ये भेसळ हा गंभीर प्रश्न बनलाय. उत्तर प्रदेशमध्ये दूध आणि चिज भेसळीचा एक कारखानाच सापडलाय. गंभीर बाब म्हणजे भेसळीचा एक फॉर्म्युलाच एका व्यावसायिकानं विकसीत केला होता. त्यातच FSSAI ने देशभरातून घेतलेल्या दूधाच्या सॅम्पल चाचणीचा धक्कादायक अहवाल समोर आलाय.
सर्वांचाच दिवस दुधापासून सुरू होतो आणि दुधावर संपतो. मात्र तुमच्या घरात येणार हे दूध नकली असल्याची धक्कदायक माहिती समोर आलीय. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI ने दुधाच्या शुद्धतेबाबत सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील ४१ टक्के दुधाचा दर्जा चांगला नाही. त्यामध्ये भेसळ आहे.
भेसळीचे हे रॅकेट किती खोलवर गेलंय याचा धक्कादायक पुरावा उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये सापडलाय. बनावट दूध आणि चीज कारखाना तिथं सापडला आहे. केवळ १ लिटर केमिकलने ५०० लिटर बनावट दूध तयार केले जाते. व्यापारी अजय अग्रवालनं अनेक रसायने मिसळून बनावट दूध आणि चीज बनवण्याचा फॉर्म्युला शोधून काढल्याचे उघड झाले.
- दिल्ली, तमिळनाडू, केरळ, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र येथील साडे सहा हजार दूधाचे सॅम्पल घेण्यात आले.
- FSSAI अहवालानुसार देशातील ४१ टक्के दुधाचा दर्जा चांगला नाही.
- ४१ टक्के प्रक्रिया केलेले आणि कच्चे दूध गुणवत्तेचे निकष पूर्ण करत नाही.
- ४१ टक्के दुधात फॅट आणि सॉलिड्स नॉट फॅटचे प्रमाण कमी आढळले आहे.
- भेसळीत हायड्रोजन पेरॉक्साइड, डिटर्जंट, युरिया, साखर असे घटक आढळले आहेत.
- पचनशक्तीवर परीणाम होतो.
- जुलाब, गॅस आणि पोटदुखीची समस्या उदभवू शकते.
- किडनीवर प्रतिकूल परीणाम होऊ शकतो.
- हाडं आणि दातांच्या आरोग्यावर परीणाम.
- खासकरुन मुलांसाठी हा मोठा धोका आहे.
- कर्करोगाचाही धोका आहे
कसं ओळखाल भेसळयुक्त दूध?
- अर्धा चमचा दुधात सोयाबीन पावडर मिसळा. या मिश्रणात लिटमस पेपर घाला. लिटमस पेपरचा रंग लाल- निळा झाला, तर दुधात भेसळ आहे हे समजून जा.
- अशा दुधाला साबणाचा वास येतो. हे दूध हाताच्या बोटांवर घेऊन घासा, त्यातून फेस तयार होईल.
- दुधाचे काही थेंब पॉलिश केलेल्या फरशीवर टाका. दूध शुद्ध असेल तर थेंब ओघळून मागे डाग राहतात. पण जर दुधात भेसळ असेल, तर त्याचे काहीच डाग राहणार नाही.
- नैसर्गिक दुधाचा खवा एकदम मऊसर बनतो. दुधात भेसळ असेल तर खवा कडक होतो.
दूधाला पुर्णान्न समजलं जातं....त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण दूध पितात आणि दुधाचे पदार्थ खातात. त्यामुळे तुमच्या घरात येणारं दूध भेसळयुक्त असेल तर तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नकली दुधापासून सावध राहा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.