

मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेत राज ठाकरेंनी अदानी सम्राज्याचा व्हिडिओ दाखवला. २०१४ पर्यंत गौतम अदानी हे कुठेच नव्हते. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानीचं साम्राज्य तुफान वाढलं. गौतम अदानी यांच्या व्यापार करण्याला विरोध नाही मात्र एकाच माणसाला इतकं सरकार इतके मेहरबान का असा असा सवाल राज ठाकरें केला. मुंबईसह देश विकायाला काढला आहे असाही आरोप राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केला.
यासभेत राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. या सभेत त्यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या प्रकल्पांची यादी दाखवली. मुंबई महानगर, महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील गौतम अदाणींच्या प्रकल्पांची यादी दाखवली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून गौतम अदानी यांच्या प्रोजेक्टमध्ये किती वाढ झाली? याची आकडेवारी राज ठाकरे दाखवली.
भाजपनं आख्खा महाराष्ट्र आणि आख्खा देश विकायला काढलाय. आपल्यासमोर काय वाढवून ठेवलंय याचा आपल्याला अंदाज नाहीये. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनंतर माझ्या टीमने केलेल्या रिसर्चमधून धक्कादायक बाब समोर आल्याचं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर राज ठाकरेंनी अदानी यांच्या साम्राज्याची एक क्लिप दाखवली. ते सगळं पाहिल्यानंतर तुम्हाला भिती वाटेल. ते पाहून निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या”, असं राज ठाकरे म्हणाले.
यावेळी राज ठाकरेंनी आधी भारताचा नकाशा दाखवला त्यात २०१४ साली गौतम अदानी यांचे प्रोजेक्ट किती होते? याची आकडेवारी दाखवली.मोदी पंतप्रधान होण्याआधी गौतम अदाणी कुठे होते आणि त्यानंतर आज गौतम अदाणी कुठे आहेत?”, असं राज ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.