ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीरातले स्वादुपिंड जेव्हा पुरेसे इन्सुलिन तयार करु शकत नाही, किंवा शरीरातील तयार झालेल्या इन्सुलिनला पेशींकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही तेव्हा एखादी व्यक्ती मधुमेहाला बळी पडते.
चला तर जाणून घेऊया रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.
संत्र्यांमध्ये पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. तसेच संत्रीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्याने मधुमेह रुग्ण याचे सेवन करु शकतात.
रताळ्याचे ग्लायसेमिक इंडेक्स हे बटाट्यापेक्षा कमी असते त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही रताळे खाऊ शकता.
गाजर हे पोषक तत्वाने भरपूर आहे आणि गाजरचा ग्लायसेमिक इंडेक्स ३० आहे त्यामुळे गाजरचा आहारात समावेश करु शकता.
दालचिनीमध्ये अँटी व्हायरल आणि अँटी इन्फ्लेमेन्टरी गुणधर्म असतात. हे इन्सुलिनची पातळी वाढवण्याचे काम करतात त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
फ्लॅावर, कोबी आणि ब्रोकोली सारख्या भाज्यांचा आहारात समावेश केल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
कार्बोहायड्रेटस, फायबर, व्हिटॅमिनस आणि अंटीऑक्सिडंटसने भरपूर असलेल्या सफरचंदाचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. मधुमेह रुग्णांसाठी हे फळ फायदेशीर ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक, काय आहे कारण?