ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकचे प्रमाण वाढते, यामागे अनेक कारणे असू शकतात.
हालचालीचा अभाव, हाय ब्लड प्रेशर आणि व्हायरल इन्फेक्शनस यांमुळे ब्रेन स्ट्रोक येऊ शकतो.
थंडीमुळे शरीरातील रक्त गोठण्याची शक्यता असते, ज्यामुळे शरीराच्या हालचालीवर परिणाम होतो. आणि रक्तप्रवाह करणाऱ्या धमन्या आकुंचन पावू लागतात. यामुळे ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो.
हिरव्या भाज्या, फळे, ड्राय फ्रुट्स यांचा आहारात समावेश करा. प्रोसेस्ड आणि फास्ट फूड खाणं टाळा.
थंडीमुळे शरीरातील रक्त गोठण्याची शक्यता असते,तसेच रक्तप्रवाह करणाऱ्या धमन्या आकुंचन पावू लागतात. याचा परिणाम शरीरावर होतो. यामुळे ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो.
वेळोवेळी ब्लडप्रेशर तपासा. ब्लडप्रेशरचा त्रास असल्यास डॅाक्टरांचा सल्ला घ्या.
रोज सकाळी कोवळ्या उन्हात चाला यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होईल.
शरीराला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी व्यायाम करा. किंवा ३० ते ४० मिनिटे योगा करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: हिवाळ्यात खा हेल्दी पालक पनीरचा पराठा; नोट करा रेसीपी