ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पालक पनीरची भाजी जवळपास प्रत्येक घरात बनते. मात्र,आज आम्ही तुम्हाला पालक पनीर पराठा कसा बनवायचा याची रेसीपी सांगणार आहोत.
पालक पनीर पराठा टेस्टी आणि हेल्दी आहे. याची रेसीपी तितकीच सोपी आहे. चला तर जाणून घेऊया पालक पनीर पराठ्याची रेसीपी.
सर्वप्रथम पालकला स्वच्छ धुवून घेऊन मिक्सर मध्ये बारीक करुन घ्या. यामध्ये मीठ आणि मिरची कापून अॅड करा.
या मिश्रणाला गव्हाच्या पीठामध्ये मिक्स करा आणि पीठ मळून ठेवा.
आता पनीरला मॅश करुन यात मीठ, लाल मसाला आणि धण्याची पावडर अॅड करुन पराठ्यासाठी मिश्रण तयार करा.
एका चपातीच्या आकाराचा पीठाचा गोळा घ्या यामध्ये पनीरचे मिश्रण अॅड करुन पराठा अलगद लाटा.
गरम तव्यावर थोडे तेल लावून पराठा दोन्ही बाजूने मंद आचेवर भाजा.
गरमागरम पालक पनीर पराठ्याला लोणचं किंवा चटणीसोबतत सर्व्ह करा.
NEXT: हिवाळ्यात दही खाणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या