देश विदेश

Crime News: करवा चौथचा उपवास जोडीनं सोडला; नवऱ्यांना जेवायला दिलं अन् मध्यरात्रीच १२ बायकांनी ठोकली धूम

Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये करवा चौथच्या दिवशी १२ नववधूंनी लाखो रुपये आणि दागिने घेऊन पळून गेल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Dhanshri Shintre

  • करवा चौथच्या दिवशी बिहारहून आलेल्या बारा वधूंनी लाखो रुपये घेऊन पळ काढला.

  • अलीगढ आणि इग्लासमध्ये ९-१० ऑक्टोबर रोजी ही विवाह सोहळा पार पडला होता.

  • पोलिसांनी बिहारकडे विशेष तपास पथक पाठवून संशयितांचा शोध सुरू केला आहे.

  • हे प्रकरण एक संघटित फसवणूक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

अलीगढमध्ये करवा चौथच्या शुभदिनी घडलेली एक अनोखी पण धक्कादायक घटना सध्या संपूर्ण प्रदेशात चर्चेचा विषय ठरली आहे. बिहारमधून विवाहासाठी आलेल्या बारा वधूंनी लाखो रुपये आणि रोखरक्कम घेऊन रात्री घरातून पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. संशयित वधू आणि त्यांच्या टोळीचा शोध घेण्यासाठी विविध पथके बिहारकडे रवाना झाली आहेत.

सुरुवातीच्या माहितीनुसार, ही सर्व लग्न अलीगढ शहर आणि इग्लास परिसरात ९ आणि १० ऑक्टोबर २०२५ रोजी झाली होती. बिहारहून आलेल्या या वधूंचे सर्व विवाह दलालांमार्फत आयोजित करण्यात आले होते. मुख्य दलाल म्हणून ओळखला जाणारा मुकेश गुप्ता उर्फ ​​सचिन हा बिहारचा रहिवासी असून, त्याने प्रत्येक विवाहासाठी सुमारे १ ते १.३ लाख रुपये कमिशन घेतले होते. विवाहानंतर या महिलांना त्यांच्या ‘सासरी’ ठेवण्यात आले. जिथे त्यांनी काही दिवस साध्या गृहिणीसारखे वागणूक ठेवून सर्वांचा विश्वास जमवून घेतला.

करवा चौथच्या दिवशी संध्याकाळी सर्व वधूंनी पारंपरिक रितीनुसार व्रत केले, पूजा केली आणि पतींसाठी चंद्रदर्शनाचे विधी पूर्ण केले. मात्र, जेव्हा सर्व कुटुंबीय चंद्रदर्शनानंतर एकत्र जेवायला बसले तेव्हा वधूंनी दिलेल्या अन्नात आणि पाण्यात औषध मिसळले. ज्यामुळे सगळे बेशुद्ध झाले. रात्रीच्या वेळी परिस्थितीचा फायदा घेत सर्व १२ वधूंनी घरातील दागदागिने, रोख रक्कम आणि महागड्या वस्तू उचलून पळ काढला. सकाळी शुद्धीवर आल्यावर कुटुंबीयांना हा मोठा फटका बसला. घरातील नव्या वधूंसह सोन्याची आणि पैशांची बॅग गायब झालेली होती.

या घटनेत ३० लाख रुपयांहून अधिक मालमत्ता आणि रोकड चोरीला गेली आहे. विशिष्ट प्रकरणांमध्ये निहाल शर्मा यांच्या घरातून १० लाखांची तर वीर सिंग यांच्या घरातून २ लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली. तर इतर कुटुंबांमधून प्रत्येकी २ ते ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत चार कुटुंबांनी सासनी गेट आणि इग्लास पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केले असून, उर्वरित आठ कुटुंबांनाही तक्रार नोंदवण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास युद्धपातळीवर सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींना शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

ही काही बाधित कुटुंबे आहेत.

निहाल शर्मा (सासनी गेट): (मुलगा) प्रतीक, वधूने ४ लाख रुपये रोख, ६ लाख रुपयांचे दागिने (एकूण १० लाख रुपये) पळवून नेले.

वीर सिंग (इग्लास, कैलाश नगर): (मुलगा) प्रेमवीरच्या वधूने २ लाख रुपयांचे दागिने चोरले.

प्रवीण उर्फ ​​काळू (भूरा गौरव) : २ लाखांचे दागिने चोरले.

रणवीर उर्फ ​​नैना (भूरा गौरव): २ लाख रुपयांचे दागिने चोरले.

इतर ८ कुटुंबांकडून प्रत्येकी सुमारे २ लाख रुपये चोरीला गेले.

अलीगढ पोलिसांनी बिहारकडे एक विशेष तपास पथक रवाना केले असून, या विवाह फसवणुकीच्या टोळीचे जाळे उध्वस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीईओ पहिला मयंक पाठक यांनी सांगितले की हा एक संघटित गुन्हा आहे आणि मुख्य दलालांना अटक करणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी आहे.

माजी महापौर शकुंतला भारती यांनी पीडित कुटुंबांची भेट घेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला आणि पोलिसांनी कठोर कारवाई करून अशा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनोळखी व्यक्तींशी अशा प्रकारचे विवाह करणे टाळण्याचे आवाहन केले आहे. या घटनाक्रमामुळे अलीगढ आणि परिसरातील जनमानसात भीतीचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Tourism : स्वच्छ वाळू अन् हिरवेगार वातावरण, 'हा' आहे वसईजवळील शांत समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Solapur Reelstar Couple: प्रत्येक नवरा-बायकोनं बघावी अशी लव्ह स्टोरी! सोलापूरच्या कपलची संघर्ष कहाणी साऊथमध्ये झळकणार, VIDEO बघून डोळ्यात येईल पाणी

Maharashtra Politics : भाजपमध्ये अल्पसंख्याक सेल का? व्होट जिहादच्या आरोपावर मनसेचा खोचक सवाल

Crime News: पुणे, बीडनंतर आता लातूरमध्ये गुंडाराज;भरचौकात तरुणावर तलवारीनं हल्ला, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT