Gold-Silver Price Today Saam Tv
देश विदेश

Gold-Silver Price Today : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात वाढ; चांदीत घसरण, पाहा आजचे दर

Akshaya Tritiya Gold Silver Rate In Maharashtra : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते, पाहा आजचा दर

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : आज अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा मुहूर्त. या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्याचा कल अधिक असतो. या आठवड्यात सोन्या-चांदीचे दर कमी होत असताना पुन्हा त्याच्यात वाढ होताना दिसली.

लग्न सराई, शुभ मुहूर्त व सणांच्यानिमित्ताने हे दर सातत्याने कमी जास्त होताना पाहायला मिळाले. काल सराफ बाजार बंद होताना सोन्याचे (Gold) भाव पुन्हा वाढले.

तर आज गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Price) 56,050तर 24 कॅरेट साठी 61,150 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 769 रूपये आहे. (Gold Silver Price update 22nd April 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 61,150रुपये

दिल्ली - 61,300 रुपये

हैदराबाद - 61,150 रुपये

कोलकत्ता - 61,150 रुपये

लखनऊ - 61,300 रुपये

मुंबई (Mumbai) - 61,150 रुपये

नागपूर - 61,150 रुपये

पुणे (Pune) - 61,150 रुपये

2. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते

शनिवारी 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया साजरी होणार आहे. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते कारण यामुळे तुमच्या घरात शांती आणि समृद्धी येते. असे मानले जाते की जर तुम्ही या दिवशी कोणतीही खरेदी केली तर त्याचे मूल्य वाढते आणि ते नेहमी तुमच्यासोबत राहते, कधीही कमी होत नाही आणि वेळेनुसार वाढते. म्हणूनच या दिवशी बरेच लोक प्रॉपर्टी आणि स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात.

3. सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ होणार?

गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. त्यातच भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने दिवसागणिक थोडा का होईना, भाव वाढतच आहेत. दुसरीकडे शेअर बाजारात पडझड सुरू असल्याने अनेकांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला पसंती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT