आझमगडमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या प्रचारसभेत गोंधळ झाल्याची घटना घडलीय. प्रचारसभेत आलेल्या नागरिकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. नागरिकांची गर्दी अनियंत्रित होत असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी नागरिकांवर लाठीचार्ज केला. अखिलेश यादव यांच्या रॅलीत सपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यादरम्यान अचानक या लोकांनी बॅरिकेड्स तोडून अखिलेश यांच्या स्टेजकडे जाण्याचा प्रयत्न केला.या नागरिकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस आणि स्टेजवर लाठ्या-खुर्च्याही फेकल्या.
दरम्यान या गोंधळानंतर पोलिसांनी लाठी चार्ज केल्यानंतर नागरिकांचा जमाव शांत झाला. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू असल्याने अखिलेश यादव याची जाहीर सभा वेळेवर होऊ शकली. यावेळी अखिलेश यादव यांनी सपा कार्यकर्त्यांना हे करू नका, असे समजावून सांगितलं. यानंतर अखिलेश यादव यांची जाहीर सभा उशिरा सुरू झाली.
भाजपच्या विरोधात मतदानाचा ट्रेंड सुरू झालाय. अखेरीस पूर्वांचलच्या निवडणुका संपल्या की भाजपला साफ केले जाईल. भाजपनेही शेतकऱ्यांना अडचणीत आणल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी केलाय. अखिलेश पुढे म्हणाले की, आता शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही आणि वाढलेलेही नाही. तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर बेरोजगार आहेत. नोकरी द्यावी लागू नये म्हणून परीक्षेचे पेपर लीक केले गेले असल्याचा आरोपही अखिलेश यादव यांनी केलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.