Girlfriend-Boyfriend Viral Video Saam Tv
देश विदेश

Viral Video : Valentine आधीच प्रेमी युगुलाचा खुल्लम खुल्ला प्यार व्हायरल; धावत्या बाईकवर जोडप्याचा रोमान्स

Girlfriend-Boyfriend Viral Video : गर्लफ्रेंड धावत्या बाईकवर बॉयफ्रेंडच्या मांडीवर बसून रोमान्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

वृत्तसंस्था

Girlfriend-Boyfriend Viral Video News : सध्या जगभरात व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. अशात तरुण-तरुणींच्या प्रेमाला उधाण आल्याचं पाहायला मिळतं. काही तरुण-तरुणी प्रेमाच्या नादात इतके हरवून जातात की त्यांना ना लाज वाटते ना नियमांची काळजी. लखनऊ आणि छत्तीसगडमध्ये बाइकवर रोमान्स करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता अजमेरमधून आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये एक प्रेमी युगल मोकळ्या भररस्त्यात बाइकवर रोमान्स करताना दिसत आहे.या प्रेमी युगलला ना रस्त्याने चालणाऱ्या लोकांची पर्वा होती ना ट्रॅफिकच्या नियमांची काळजी. व्हायरल व्हिडिओमध्ये प्रियसी ही प्रियकराच्या मांडीवर बसली आहे. प्रियसी ही प्रियकराला घट्ट बिलगून बसली आहे. त्याचबरोबर प्रियसी कधी त्या मुलाचे चुंबन घेत आहे तर कधी त्याला मिठी मारत आहे.

दोघांचा रोमान्स पाहून रस्त्याने आजूबाजूला असणाऱ्या वाहन चालकांच्या नजरा त्यांच्याकडेच लागलेल्या दिसत आहे. सोशल मीडियावर (Social Media) प्रेमी जोडप्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. नेटकरी या जोडप्यावर चांगलेच संतापले आहेत.

पोलिसांनी गुन्हा दाखल केला

व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर अजमेरच्या ख्रिश्चन गंज पोलिसांनी (Police) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन्ही प्रेमीयुगुलांची ओळख पटवून त्यांना चौकशीसाठी बोलावले. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी  मुलाची दुचाकी जप्त केली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू असून, हे दोघे दोषी आढळल्यास या दोघांवरही नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली आहे, लोक त्या मुला-मुलीवर टीका करत आहेत, काहींनी त्यांना 'बेशरम' म्हटले आहे तर काहींनी 'या लोकांच्या आई-वडिलांचे काय होणार', असे लिहिले आहे. तर आणखी एका व्यक्तीने हे अत्यंत निर्लज्ज अश्लील कृत्य आहे, त्यांना ताबडतोब तुरुंगात पाठवलं पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

Shocking : तोंडात कापडाचा बोळा कोंबला, हात-पाय रश्शीने बांधले; मुलाने आईला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics: भाजप मारणार एका दगडात दोन पक्षी? अजित दादांच्या गडाला भाजपचा सुरुंग

मुख्यमंत्र्यांच्या आईवर बोललो नाही, तू पंतप्रधानांच्या आईवर काय बोलला, दाखवू का? मनोज जरांगेंचं धनंजय मुंडेंना ओपन चॅलेंज

OBC Protest: एल्गार मोर्चाआधीच भुजबळांना धक्का?मोर्चाआधीच ओबीसी नेत्यांमध्ये फूट

SCROLL FOR NEXT