nalasopara, police, prisoners
nalasopara, police, prisonerssaam tv

Nalasopara : नालासाेपारा पाेलिस ठाण्यात जेवणातून विषबाधा; नऊ जण रुग्णालयात दाखल

पाेलिसांनी तात्काळ संशयितांना रुग्णालयात पाठविले.
Published on

Nalasopara : पोलिसांच्या (police) ताब्यात असलेल्या नऊ संशयित आरोपींना विषबाधा झाल्याची घटना नालासोपारा (nalasopara) येथे घडली आहे. या सर्व संशयित आराेपी रुग्णांना पालिका रुग्णालयात (muncipal hospital) उपचारा करिता दाखल करण्यात आले आहे. (Breaking Marathi News)

nalasopara, police, prisoners
Police : अरं Birthday आहे भावाचा अन्..., सात युवकांवर गुन्हा दाखल, पाच ताब्यात

नालासोपारा पोलीस ठाण्यातील लॉकपमधे विविध प्रकारच्या गुन्ह्यात असल्याने या सर्वांना ठेवण्यात आले. त्यांना शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणा-या जेवणातून विषबाधा झाल्याचे समाेर आले आहे.

या सर्वांना उलटी आणि मळमळ याचा त्रास जाणवत हाेता. त्याबाबतची माहिती पाेलिसांपर्यंत पाेहचताच त्यांनी रुग्णवाहिका मागवली. त्यानंतर सर्वांना पालिका रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. सध्या सर्व रुग्णांच्या आराेग्याची स्थिती ठीक असल्याची माहिती वैद्कीय अधिका-यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com