Ajit Pawar Meets Amit Shah Saam Tv
देश विदेश

Maharashtra Politics: अमित शाह आणि अजित पवारांमध्ये तब्बल दीडतास चर्चा, भेटीमागचं नेमकं कारण काय? वाचा सविस्तर....

Ajit Pawar Meets Amit Shah: अमित शाह आणि अजित पवारांमध्ये तब्बल दीडतास चर्चा, भेटीमागचं नेमकं कारण काय? वाचा सविस्तर....

Satish Kengar

Ajit Pawar Meets Amit Shah:

एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीडतास चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यावेळी अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. अमित शाह आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार हे आज दिल्लीला अमित शाह यांची भेट घेण्यासाठी गेले होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांना डेंग्यू आजार झाल्याने ते कोणाचीही भेटीगाठी घेणं किंवा सक्रिय राजकरणात असणं टाळत होते. मात्र आज सकाळी अचानक दिल्लीला रवाना झाले आणि त्यांनी शाह यांची भेट घेतली.  (Latest Marathi News)

दिवाळीनिमित्त ही भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाच्या सुनावणी बाबत चर्चा झाली, असं सांगण्यात येत आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

तत्पूर्वी आज सकाळी अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यात रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात ही भेट झाल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र आता वळसे पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेल्यानंतर अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याने राज्यातील राजकीय समीकरण पुन्हा बदलणार का? अशी चर्चा जोर धरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यात कोण कोण भाषण करणार?

Aastha Poonia: नौदलात लढाऊ विमान उडवणारी पहिली महिला पायलट; कोण आहेत सब लेफ्टनंट आस्था पुनिया?

Maharashtra politics : मराठी भाषेच्या अस्मितेचा वाद टोकदार, शिंदेंनी दिला 'जय गुजरात'चा नारा

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT