GST Council: केंद्राने अजित पवारांची केली महत्त्वाच्या पदावर नियुक्ती  Saam TV
देश विदेश

GST Council: केंद्राने अजित पवारांची केली महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

भाजप आणि राष्ट्रवादी कांग्रेस जवळ येत असल्याचा कयास या निमित्ताने काढला जात आहे.

विहंग ठाकूर

नवी दिल्ली: लखनऊमध्ये (Lucknow) पार पडलेल्या जीएसटी कौन्सिलच्या (GST Council) बैठकीनंतर केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली जीएसटी प्रणाली सुधारणांवर मंत्र्यांचा एक गट (GOM) तयार केला आहे. पवार हे मंत्रिगटाचे संयोजक असतील, तर त्यांच्या सदस्यांमध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला आणि आंध्र प्रदेशचे अर्थमंत्री बग्गाना राजेंद्रनाथ यांचा समावेश आहे.

परंतु अजित पवार यांना केंद्रानं संयोजक केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी (BJP-NCP) कांग्रेस जवळ येत असल्याचा कयास या निमित्ताने काढला जात आहे. महत्त्वाच्या समितीचे संयोजक पद अजित पवारांना दिल्यामुळे भाजप राष्ट्रवादी एकमेकांना टाळी देतेय का अशा चर्चाही सुरू झाल्या आहेत.

अजित पवारांची समिती काय काम करणार ?

- टॅक्स अधिका-यांकडील उपलब्ध साधने आणि इंटरफेसचा आढावा घेईल

- राज्य आणि केंद्रीय कर रचनेत चांगला समन्वय स्थापन करणे

- व्यवसायाच्या प्रक्रियेतील बदलांसह, महसूल गळती रोखण्याचे काम करेल.

- चोरीचे संभाव्य स्त्रोत ओळखण्यासह प्रणालीला अधिक प्रभावी आणि कार्यक्षम बनवण्यासाठी उपाय सुचवेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण डोंबिवलीतून ४० जण तडीपार; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई

Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहनेच का घ्यावीत, भविष्याच्या दृष्टीने काय आहे फायदा?

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

SCROLL FOR NEXT