गुलाब चक्रीवादळाचे जालन्यात पडसाद, शेतीला तळ्याचे स्वरुप; पाहा Video

जालना जिल्ह्यात (Jalna District) काल गुलाब चक्रीवादळ मुळे झालेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत.
गुलाब चक्रीवादळाचे जालन्यात पडसाद, शेतीला तळ्याचे स्वरुप; पाहा Video
गुलाब चक्रीवादळाचे जालन्यात पडसाद, शेतीला तळ्याचे स्वरुप; पाहा VideoSaam TV
Published On

जालना जिल्ह्यात (Jalna District) काल गुलाब चक्रीवादळ मुळे झालेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेली आहेत. त्यामूळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. सोयाबीन, कपाशी, ऊस पिकांत तीन ते चार फूट पाणी साचलं असून शेतांना तळ्याचं स्वरूप आलं आहे. त्यामुळे जमिनीवर आडवी झालेली पिकं पाण्यातच सडण्याची शक्यता आहे. आणि या परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगावं तरी कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुलाब चक्रीवादळाचे जालन्यात पडसाद, शेतीला तळ्याचे स्वरुप; पाहा Video
नाशिक औरंगाबादमध्ये कोसळधार; धरणं भरली, पाण्याचा विसर्ग सुरु

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या सुखापुरी, गोंदी, वडीगोद्री मंडळात 164, 133, 160, मी.मी. पाऊसाची नोंद झाली आहे. आणि त्यातच या परिसरातून वाहणाऱ्या गोदावरी जायकवाडी धरणातून 18 दरवाजाच्या माध्यमातून दहा हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्याच्या चिंतेत आणखीच भर पडली आहे. मराठवाड्याला पावसाने चांगलचं झोडपून काढलं आहे. औरंगाबाद, बीडमध्ये पावसाने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.त

दरम्यान राज्यात आठवड्या भरापासून मुसळाधार पाऊस सुरु आहे. अनेक जिल्ह्यातील शेती खराब झाली आहे. शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. राज्य सरकारकडून अनेक ठिकाणी पंचनामे व्हायचे बाकी आहेत. मुख्यमंत्र्यांनी शेकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचबरोबर शेकऱ्यांनी धीर धरवा असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com