नाशिक औरंगाबादमध्ये कोसळधार; धरणं भरली, पाण्याचा विसर्ग सुरु

सकाळी 35 हजार क्यूसेक असणारा विसर्ग दुपारी 12 वाजल्यानंतर 45 हजार क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे.
नाशिक औरंगाबादमध्ये कोसळधार; धरणं भरली, 
पाण्याचा विसर्ग सुरु
नाशिक औरंगाबादमध्ये कोसळधार; धरणं भरली, पाण्याचा विसर्ग सुरुSaam TV
Published On

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) नांदूरमध्यमेश्वर धरणातून (Nandur Madymeshwar Dam) 45 हजार क्यूसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात (Godawari River) पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सकाळी 35 हजार क्यूसेक असणारा विसर्ग दुपारी 12 वाजल्यानंतर 45 हजार क्यूसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातील गंगापूर आणि दारणा धरणांच्या (Gangapur and Dharna) पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यानं या दोन्ही धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

नाशिक औरंगाबादमध्ये कोसळधार; धरणं भरली, 
पाण्याचा विसर्ग सुरु
गोदावरीला पूर; सोमेश्वर धबधब्यावर गर्दी टाळा प्रशासनाचे आवाहन

नांदूरमध्यमेश्वरमधून जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्गात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक शहराच्या पुढेही गोदावरी किनारी काही भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीच्या दिशेनं इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्यानं जायकवाडीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होणार आहे.

औरंगाबादमध्ये जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडून १० हजार क्यूसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याने गोदावरीचं पात्र आता दुथडी भरून वाहत आहे. जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस बॅटींग सुरु आहे. मराठवाड्याला पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. अजूनही लोक मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणा पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com