दक्षिण आफ्रिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आफ्रिकेतील मलावीमध्ये उपराष्ट्रपतींचे एअरक्राफ्ट बेपत्ता झाल्याचे समजत आहे. मलवीच्या राष्ट्रपती कार्यालयाने यासंदर्भातली माहिती दिली आहे.
इराणच्या अध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघाताची घटना घडली होती. त्यात आता दक्षिण आफ्रिकेपूर्ण आफ्रिकेतील देश मलवीमध्ये उपराष्ट्रपतींचे एअरक्राफ्ट बेपत्ता झाले आहे. बेपत्ता झालेल्यामध्ये उपराष्ट्रपती सौलोम क्लॉस चिलिमा यांच्यासह नऊजण बेपत्ता आहेत. त्यामुळे मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रपती कार्यालय आणि कॅबिनेटने यासंदर्भातील माहिती देताना सांगितले की, एअरक्राफ्ट रडारवरुन गायब झाले होते. मात्र त्यानंतर विमान उड्डाण अधिकाऱ्यांकडून विमानाशी पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु झाला.परंतू आता यात अद्याप यश आलेलं नाही. सर्वांचा शोध घेण्यासाठी बचावपथक पाठवण्यात आलेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,५१ वर्षीय चिलिमा मलावी हे लष्कराच्या एअरक्राफ्टमध्ये (Aircraft )होते. स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.१७ मिनिटांनी त्यांनी राजधानी लिलोंग्वे येथून एअरक्राफ्टमध्ये उड्डाने केले होते. अर्थात भारतीय वेळेनुसार १२ वाजून ४५ मिनिटाला ही संपूर्ण बेपत्ता झाल्याची घटना घडली. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्वांना शोधण्यासाठी बचाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे.
चिलिम यांच्यावर साधारण २०२२ वर्षांत एका ब्रिटिश मलावी उद्योगपतीकडून पैसे(Money) घेतल्याचा आरोप झाला होता. मात्र त्यानंतर त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच त्यांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले होते. त्यांच्यावर भष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले होते. मात्र चिलिमा यांच्या एअरक्राफ्टबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
इराणच्या अध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघाताची घटना घडली असतानाच दक्षिणपूर्ण आफ्रिकेतील देश मलावी मध्ये उपराष्ट्रपतींचे एअरक्राफ्ट बेपत्ता झाल्याची माहिती मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.