National Politics: या पाच राज्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार, जाणून घ्या काय आहे कारण?

BJP News: अपेक्षेप्रमाणे कामगिरी न केल्यामुळे भाजप पाच राज्यांमध्ये आपले प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती समोर येत आहे.
National Politics: या पाच राज्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार, जाणून घ्या काय आहे कारण?
JP Nadda and Amit ShahSaam Tv

भारतीय जनता पक्ष (BJP) गुजरात, तेलंगणा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती करणार आहे. कारण या राज्यांच्या विद्यमान प्रदेशाध्यक्षांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. याशिवाय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी न केल्यामुळे तामिळनाडू आणि राजस्थानचे भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचीही नव्याने निवड होणार आहे. कारण विद्यमान अध्यक्ष जेपी नड्डाही केंद्रीय मंत्रिमंडळाचा भाग बनले आहेत आणि त्यांचा कार्यकाळही 30 जून रोजी संपत आहे. अशातच आता भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियुक्तीनंतरच या राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचीही नियुक्ती होणार असल्याचे बोललं जात आहे.

National Politics: या पाच राज्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार, जाणून घ्या काय आहे कारण?
BJP New President: जेपी नड्डा यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश, कोण होणार नवीन भाजप अध्यक्ष? विनोद तावडे यांच्या नावाची चर्चा

पक्षाशी संबंधित एका नेत्याने या माहितीला दुजोरा दिला आहे. पण नड्डा यांच्या जागी नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची नियुक्ती कधी केली जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. नड्डा यांना कालच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून आज त्यांना आरोग्य मंत्री करण्यात आले आहे.

याशिवाय गुजरात भाजपचे अध्यक्ष आणि चार वेळा खासदार सीआर पाटील यांनाही राज्यात पक्षाच्या सातत्याने चांगल्या कामगिरीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मात्र गुजरात भाजप अध्यक्षपदाचा त्यांचा कार्यकाळ काही महिन्यांपूर्वीच संपला आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांना या पदावर राहण्यास सांगण्यात आले होते. आता ते केंद्र सरकारमध्ये मंत्री झाल्याने त्यांच्या जागी नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती होणार आहे.

National Politics: या पाच राज्यांमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार, जाणून घ्या काय आहे कारण?
Nilesh Lanke: 'ये तो ट्रेलर है, विधानसभा अभी बाकी है', NCPच्या मेळाव्यात निलेश लंकेंनी उडवली कॉलर

दरम्यान, भाजपने राजस्थानमधील संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्याची योजना आखली आहे, असं सांगण्यात येत आहे. कारण भाजपने लोकसभेच्या 25 पैकी फक्त 14 जागा जिंकल्या आहेत. याआधी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानमधील सर्व 25 जागांवर क्लीन स्वीप केला होता. येथे अपेक्षेप्रमाणे कामगिरी न झाल्यामुळे आता खासदार असलेले विद्यमान प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनाही बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन प्रदेशाध्यक्षपदासाठी राज्यसभा खासदार राजेंद्र गेहलोत, कुलदीप धनखर, पक्षाचे जाट चेहरा मदन राठोड आणि माजी विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांच्या नावांचा विचार केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com